मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडी

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडी
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडी

पुणे ः राज्यातील थंडीत चढउतार सुरू आहे. मध्य महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात किंचित थंडी आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा पुन्हा काही प्रमाणात कमी झाला आहे. येत्या चार ते पाच दिवस राज्यात किंचित थंडी राहणार असून काही भागांत कमी अधिक स्वरूपात राहील. गुरुवारी (ता. १६) सकाळी नाशिकमधील निफाड येथे ९.४ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   गेल्या दोन दिवसांपूर्वी मध्य महाराष्ट्र व परिसर आणि मध्य प्रदेश या दरम्यान चक्रावाताची स्थिती असल्याने थंडी कमी झाली होती. मात्र, ती स्थिती निवळून गेल्याने पुन्हा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात किंचित थंडी वाढली आहे. सध्या दिवसभर हवामान कोरडे असल्याने आकाशही निरभ्र आहे. त्यामुळे दिवसभर पडत असले तरी सायंकाळनंतर थंडी जाणवत आहे. मध्यरात्रीनंतर थंडीत वाढ होऊन पहाटे बऱ्यापैकी थंडी जाणवत आहे.   बहुतांशी भागात हवामान कोरडे असल्याने थंडी कमीअधिक आहे. कोकणातील काही भागांत किंचित थंडी वाढली आहे. या भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने घटले असून किमान तापमान १५ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातही थंडी कमी अधिक स्वरूपात आहे. नाशिक, नगर, पुणे, सातारा, जळगाव या भागांत काही प्रमाणात थंडी आहे. सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागांत थंडी कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमान या भागात पुन्हा ९ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली आले आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्याच्या बहुतांशी भागातही किचिंत थंडी आहे. या भागात किमान तापमानाचा पारा १२ ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.  गुरुवारी (ता. १६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः  नगर १३.६ (१), अकोला १५.० (१), अलिबाग १६.९ (-१), अमरावती १५.०(१), औरंगाबाद १५.५ (३), बुलडाणा १४.८, चंद्रपूर १५.२, डहाणू १५.२(-२), गोंदिया १४.० (१), जळगाव १६.० (४), कोल्हापूर १६.६ (१), महाबळेश्वर १०.८ (-३), मालेगाव १३.२ (३), मुंबई १५.४(-२), नागपूर १३.८, नांदेड १२.० (-२), नाशिक ९.८, निफाड ९.४, उस्मानाबाद १२.७ (-२), परभणी १५.५ (१), लोहगाव १३.३ (१), पाषाण १३.९ (३), पुणे १२.१ (१), रत्नागिरी १८.५(-१), सांगली १६.६ (२), सातारा १४.५ (१), सोलापूर १७.६ (१), ठाणे २०.०, वर्धा १४.४ (१), यवतमाळ १५.४. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com