agriculture news in Marathi cold decreased and minimum temperature increased Maharashtra | Agrowon

थंडी गायब; किमान तापमानात वाढ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 जानेवारी 2020

पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाल्याने राज्यातील थंडी कमी झाली आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा सरासरीच्या वर गेला आहे. तर, विदर्भात वाढलेले किमान तापमान पुन्हा सरासरीच्या खाली आले होते. सोमवारी (ता. २०) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बुधवारपर्यंत (ता. २२) थंडी कमी राहण्याचा अंदाज आहे.

पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाल्याने राज्यातील थंडी कमी झाली आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा सरासरीच्या वर गेला आहे. तर, विदर्भात वाढलेले किमान तापमान पुन्हा सरासरीच्या खाली आले होते. सोमवारी (ता. २०) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बुधवारपर्यंत (ता. २२) थंडी कमी राहण्याचा अंदाज आहे.

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात वाढलेली हुडहुडी फार दिवस राहिली नाही. हे प्रवाह खंडित झाल्याने, तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात अंशत: ढगाळ हवामान होत असून, दुपारच्या वेळी उकाडा जाणवत आहे. सोमवारी (ता. २०) विदर्भात ढगाळ हवामान होते. तर मध्य महाराष्ट आणि मराठवाड्यातही अंशत: ढगाळ हवामान होते. ढगाळ हवामानामुळे थंडीतही चढ-उतार होत आहेत. 

सोमवारी (ता. २०) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १३.८ (३), धुळे ७.२, जळगाव ११.४(-१), कोल्हापूर १८.६(३), महाबळेश्वर १४.९(१), मालेगाव १२.० (१), नाशिक १२.७ (३), निफाड ११.४, सांगली १७.४ (३), सातारा १६.० (३), सोलापूर १८.५ (२), अलिबाग १८.९ (१), डहाणू १६.९ (०), सांताक्रूझ १७.६ (०), रत्नागिरी २०.० (१), औरंगाबाद १२.५ (०), परभणी १४.५ (०), नांदेड १६.० (२), उस्मानाबाद १२.९ (-२), अकोला १३.५ (-१), अमरावती १२.८ (-२), बुलडाणा १३.५ (-१), चंद्रपूर १५.४ (०), गोंदिया १२.५ (-१), नागपूर ११.७ (०), वर्धा १३.६ (०), यवतमाळ १४.६ (-१).


इतर अॅग्रो विशेष
संघर्ष येथील संपणार कधी? शेती कसत असताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, करावा...
`ज्ञानेश्‍वरी'त दडलंय कृषी विज्ञान कां सु क्षेत्री बीज घातले।  ते आपुलिया परी...
निर्यातबंदी उठविल्याचे कांदा बाजारात...नाशिक : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
साडेआठशे कोटींची एफआरपी थकलीपुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक...
‘जानुबाई’, ‘केशवराज’ संस्था ठरल्या...पुणे: पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून प्रभावी...
साम टीव्ही न्यूज महाराष्ट्रात ‘नंबर १’मुंबई ः सर्वोत्तम न्यूज चॅनेल्सच्या स्पर्धेत ‘...
कृषी परिषदेने विद्यापीठांसाठी नेमले...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे: पावसाला पोषक हवामान होत असल्याने विदर्भ,...
शेतकऱ्यांना खते, बियाणे अन् महिलांना...शुद्ध पाणीपुरवठा, गावाअंतर्गत सिमेंट रस्ते,...
सांगलीत तूर खरेदी ठप्पसांगली ः जिल्ह्यात हेक्टरी २५७ किलोच तूर खरेदी...
राज्यात गारठा वाढलापुणे  : उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह...
चीनला द्राक्ष निर्यात सुरूसांगली ः जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या...
‘लिंकिंग’बाबत कंपन्यांना नोटिसापुणे  : रासायनिक खतांच्या बाजारपेठेत होत...
बाजार समित्यांच्या निवडणुका होणार...मुंबई  ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार...
भाजीपाला शेतीतून पेलल्या साऱ्या...लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच पतीच्या निधनामुळे...
कांद्यावरील निर्यातबंदी हटविली;...नवी दिल्ली : चार महिन्यापूर्वी कांद्यावर...
सूक्ष्म सिंचन योजनेचा सात वर्षानंतर...अकोला ः सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना...
कोल्हापुरातील गूळ हंगाम अंतिम टप्प्यातकोल्हापूर : यंदाचा गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत...
पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम...सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमानातील वाढीबरोबरच किमान...