जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
अॅग्रो विशेष
राज्यात गारठा झाला कमी
पुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. शुक्रवारी (ता. १७) राज्याला हुडहुडी भरविणारी थंडी दोन दिवसांत पुन्हा गायब झाली आहे. रविवारी (ता. १९) निफाड येथे गारठा कायम असल्याने किमान तापमान नीचांकी ५.४ अंशांवर आहे. तर धुळे येथे ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात तापमानाचा पारा १० अंशांच्या पुढे गेल्याने गारठा कमी झाला आहे.

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात हुडहुडी वाढली होती. शुक्रवारी (ता. १७) निफाड येथे हंगामातील नीचांकी २.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमान १० अंशांच्या खाली आल्याने थंडीची लाट आली होती. कोकणातही किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाल्याने गुलाबी थंडी अनुभवायला मिळत होती. रविवारी (ता. १९) मात्र गारठा कमी झाल्याचे दिसून आले. पुढील काही दिवस तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.
रविवारी (ता. १९) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १२.७, धुळे ८.०, जळगाव ११.२, कोल्हापूर १८.१, महाबळेश्वर १५.०, मालेगाव १२.०, नाशिक ११.०, निफाड ५.८, सांगली १७.१, सातारा १४.३, सोलापूर १९.४, डहाणू १७.२, सांताक्रूझ १५.८, रत्नागिरी १७.९, औरंगाबाद १२.६, परभणी १५.० नांदेड १५, अकोला १४, अमरावती १५.८, बुलडाणा १३.६, चंद्रपूर १६.६, गोंदिया १५.५, नागपूर १५.३, वर्धा १७.१, यवतमाळ १५.०.
विदर्भात उद्या पावसाची शक्यता
राज्यात गारठा वाढला असला, तरी विदर्भात अंशत: ढगाळ हवामान असल्याने थंडी काहीशी कमी आहे. मंगळवारी (ता. २१) विदर्भात ढगाळ हवामानासह, अकोला, अमरावती, नागपूर आणि बुलडाणा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यत: थंड व कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
- 1 of 653
- ››