agriculture news in Marathi cold decreasing in state Maharashtra | Agrowon

थंडीचा प्रभाव काहीसा कमी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

उत्तर महाराष्ट्र ते लक्षद्वीप या दरम्यान कमी दाबाचा पट्टा असल्याने राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण आहे. थंडीचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. किमान तापमानात वाढ झाली आहे. 

पुणे ः उत्तर महाराष्ट्र ते लक्षद्वीप या दरम्यान कमी दाबाचा पट्टा असल्याने राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण आहे. थंडीचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. किमान तापमानात वाढ झाली आहे. येत्या काही दिवस थंडी कमीअधिक स्वरूपाची राहील. सोमवारी (ता.२२) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे १३.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

उत्तर भारतासह राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहेत. मागील काही दिवस ढगाळ हवामानासह अनेक ठिकाणी अवकाळीसह काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. त्यानंतर पावसाने उघडीप देत अचानक हवेत गारवा पसरल्याने किमान तापमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. त्यानंतर
पुन्हा हवेतील गारवा कमी झाल्याने किमान तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. विदर्भ वगळता उर्वरित सर्वच भागात थंडी कमीअधिक असल्याने किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे.

सध्या राज्यात आकाश निरभ्र असले तरी काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण आहे. यामुळे काही प्रमाणात थंडी पुन्हा कमी झाली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार ते पाच अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. कोकणात किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस, तर मध्य महाराष्ट्रात १३ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मराठवाड्यातही काही भागात थंडी कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. या भागात किमान तापमान १४ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. 

विदर्भातही अजूनही बऱ्यापैकी थंडी कायम आहे. गोंदिया येथे १३.८ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदविले गेले. उर्वरित भागात १४ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते.

सोमवारी (ता.२२) सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः

 • मुंबई (सांताक्रुझ) २१.५ (३)
 • ठाणे २१.२
 • अलिबाग २३.० (४)
 • रत्नागिरी २३.० (४)
 • डहाणू २१.४ (३)
 • पुणे १५.१ (३)
 • जळगाव १४.५
 • कोल्हापूर २०.६ (४)  
 • महाबळेश्वर १५.४ (१)  
 • मालेगाव १५.४ (३)
 • नाशिक १४.६ (२)
 • निफाड १३.०
 • सांगली २०.३ (५)
 • सातारा १८.३ (४)
 • सोलापूर १८.३
 • औरंगाबाद १५.८ (१)
 • बीड १७.३ (२)
 • परभणी १६.४
 • परभणी कृषी विद्यापीठ १४.०
 • नांदेड १५.०
 • उस्मानाबाद १४.४ (२)
 • अकोला १६.५
 • अमरावती १६.३ (-२)
 • बुलडाणा १६.४ (-१)
 • चंद्रपूर १६.० (-१)  
 • गोंदिया १३.८ (-३)
 • नागपूर १४.३ (-२)
 • वर्धा १६.४
 • यवतमाळ १७.० (-१)

इतर अॅग्रो विशेष
अल्प दिलासा...महाविकास आघाडी सरकारचा दुसरा आणि वर्ष २०२१-२२...
कर्जमुक्तीच्या विस्ताराला बगल : शेतकरी...मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात योजनांकरिताच्या...
कृषी संशोधनासाठीच्या तरतुदीचे स्वागतमुंबई ः राज्य अर्थसंकल्पात कृषी विद्यापीठांना तीन...
संत्रा प्रक्रिया प्रकल्पाच्या घोषणेमुळे...नागपूर ः मोर्शी तालुक्‍यात नव्या संत्रा प्रक्रिया...
विदर्भात उद्यापासून पाऊस शक्य पुणे : विदर्भाच्या काही भागांत वातावरणात बदल...
अर्थसंकल्पातून आरोग्य क्षेत्राला...पुणे ः आरोग्य संस्थांचे बांधकाम व श्रेणी...
अंमलबजावणीत दिसावा अर्थसंकल्पमुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या...
मराठा आरक्षणसंदर्भात राज्यांना नोटिसा नवी दिल्ली ः मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये...
शेती क्षेत्राच्या सुदृढतेवर भरपुणे : कोरोनाच्या संकटकाळात राज्याच्या...
देशी दुधाचा लोकप्रिय सात्विकी ब्रॅण्डमुंबई (वाशी) येथील व्यावसायिक मल्हारी चव्हाण गावी...
परिश्रमपूर्वक दुग्ध व्यवसायातून उभारले...बदलत्या परिस्थितीत शेतीवर पूर्णपणे अवलंबून न...
‘मागेल त्याला शेततळे’च्या ८४ कोटी...नगर ः कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे...
कृषिपंप रिवाइंडिंग करणाऱ्या महिला...हिंगोली ः जिल्ह्यातील आखाडा बाळापूर (ता.कळमनुरी)...
बीज परीक्षण करतात ‘मिळून साऱ्याजणी’ परभणी ः परभणी येथील कृषी विभागाच्या ‘आयएसओ’...
अडीच कोटी उलाढाल करणाऱ्या शेतकरी...जळगाव ः वर्षाला सुमारे अडीच कोटी रुपये एकूण...
मनीषाताईंनी विकसित केले तीन गुंठ्यांत...सोलापूर ः पोषण मूल्यावर आधारित अवघ्या तीन...
महिलांची शेतकरी कंपनीच्या माध्यमातून...पुणे ः महिला उत्पादक शेतकऱ्यांचे संघटन करून...
कांदा चाळीचे अखेर मिळाले अनुदाननगर ः कृषी विभागाने पूर्वपरवानगी दिल्यानंतर २०१८-...
मुलींनी सांभाळली वडिलांची शेती नांदेड : हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील गणेश...
विदर्भात अवकाळीची शक्यता पुणे : दक्षिण आसामच्या परिसरात चक्रीय स्थिती तयार...