agriculture news in Marathi cold decreasing in state Maharashtra | Agrowon

थंडीचा प्रभाव घटण्यास प्रारंभ 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

अरबी समुद्राच्या परिसरात चक्रीय स्थिती असल्याने हवेतील बाष्प ओढून घेतले आहे. यामुळे राज्यात हवामान कोरडे झाल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे. 

पुणे ः अरबी समुद्राच्या परिसरात चक्रीय स्थिती असल्याने हवेतील बाष्प ओढून घेतले आहे. यामुळे राज्यात हवामान कोरडे झाल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे. त्यातच थंडीचा प्रभावही कमी होऊ लागला आहे. पुढील काही दिवस थंडी हळूहळू कमी होऊन किमान तापमानाचा पारा वाढेल. गुरुवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंत परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या आवारात १३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहे. गेल्या आठवड्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर थंडीत चढउतार होत असून, थंडी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या वर आहे. गुरुवारीही हा पारा १३ अंश सेल्सिअसपर्यंत सरकला आहे. सकाळी अकरा वाजल्यानंतर उन्हाचा पारा काही प्रमाणात वाढू लागल्याने उकाड्यात वाढ होत आहे. त्यामुळे किमान तापमानाबरोबर कमाल तापमानातही वाढ होऊ लागली आहे. येत्या काही दिवस ही स्थिती अशीच राहणार असून, पुढील आठवड्यापासून थंडी बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता आहे. 

राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यानंतर विदर्भातही थंडी कमी होऊ लागली आहे. सध्या राज्यातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. कोकणात थंडी कमी झाल्याने किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.

मध्य महाराष्ट्रातही किंचित थंडी असल्याने किमान तापमान १३ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मराठवाड्यातील अनेक भागांत थंडी कमी झाली आहे. त्यामुळे किमान व कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. या भागात किमान तापमान १३ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भातही काही ठिकाणी थंडी असल्याने किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. 

गुरुवारी (ता. २५) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः 

 • मुंबई (सांताक्रूझ) २१.४ (२) 
 • ठाणे २२ 
 • अलिबाग २२.१ (३) 
 • रत्नागिरी २२.१ (२) 
 • डहाणू २१.२ (२) 
 • पुणे १६ (३) 
 • नगर १५.३ 
 • जळगाव १४.३ (-१) 
 • कोल्हापूर २०.६ (३) 
 • महाबळेश्‍वर १६.९ (१) 
 • मालेगाव १८ (४) 
 • नाशिक १६ (२) 
 • निफाड १३.५ 
 • सांगली १९.७ (३) 
 • सातारा १७.६ (२) 
 • सोलापूर २१ (२) 
 • औरंगाबाद १७.२ (१) 
 • बीड १६.५ (२) 
 • परभणी १४.९ (-३) 
 • परभणी कृषी विद्यापीठ १३ 
 • नांदेड १६ 
 • उस्मानाबाद १६.४ 
 • अकोला १६.२ 
 • अमरावती १७.३ (-१) 
 • बुलडाणा १८.७ (-१) 
 • चंद्रपूर १६.२ (-१) 
 • गोंदिया १४ (-२) 
 • नागपूर १५.२ (-१) 
 • वर्धा १५.८ (-१) 
 • यवतमाळ १८.५ (१) 

इतर बातम्या
खतांची दरवाढ नाहीपुणे : रासायनिक खतांच्या किमतींमध्ये कोणत्याही...
खरिपाचे गावनिहाय नियोजन ः कृषिमंत्रीकोल्हापूर ः खरिपाचे नियोजन गावातच करण्यासाठी...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...
राज्यात कृषिपंपधारकांकडून १,१६० कोटींचा...कोल्हापूर : कृषिपंप वीज धोरण योजनेअंतर्गत ११ लाख...
पूर्व भारताच्या विकासावर भर ः पंतप्रधान...नवी दिल्ली ः देशाचा पूर्व भाग नेतृत्व करत होता,...
‘रोहयो’ शेततळ्यात प्लॅस्टिक...पुणे : रोजगार हमी योजनेतून शेततळे खोदण्यासाठी...
विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पंढरपुरात...सोलापूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना...
बाजारात गर्दी नियंत्रणासाठी नियमांची...नाशिक : कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यातील...
नेरूर येथे नारळ बागेला आगसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील नेरूर कर्याद नारूर (...
जोरदार पावसाची शक्यतापुणे : ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे. तसेच...
जळगावात बीटी कापसाच्या २५ लाख पाकिटांची...जळगाव :  राज्यात कापूस लागवडीत आघाडीवर...
दर्यापूर बाजार समितीत सोयाबीनला सात...अमरावती : सोयाबीन दरातील तेजीची घौडादौड कायम असून...
मंत्रिमंडळात विदर्भाचे वजन घटलेनागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख आणि वनमंत्री संजय...
नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे शेतकरी कृषी...कोल्हापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या...
 खानदेशात कांद्याची आवक वाढतच दर दबावातजळगाव :  खानदेशात गेल्या आठवड्यात लाल...
अकोला जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना...अकोला : एकीकडे केंद्र, राज्य शासन लाभार्थ्यांच्या...
प्राधान्यक्रम एका बाबीला, निवड दुसऱ्याच... नगर : कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी...
दर वाढले म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन...परभणी : दर वाढले म्हणून बियाण्यासाठी राखून...
अवकाळीचा आजपासून अंदाजपुणे : दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत ढगाळ...
सोलापुरात वाढत्या उन्हामुळे शुकशुकाटसोलापूर ः सोलापूर शहर जिल्हयात सध्या उष्ष्णतेची...