दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस शेतकऱ्यांचे नवीन तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदो
अॅग्रो विशेष
मध्य महाराष्ट्रात थंडी; निफाडला नीचांकी ८.५ अंश तापमान
राज्यातील किमान तापमानात चढउतार होत आहे. मध्य महाराष्ट्रात असलेल्या कोरड्या वातावरणामुळे थंडी चांगलीच वाढली आहे.
पुणे : राज्यातील किमान तापमानात चढउतार होत आहे. मध्य महाराष्ट्रात असलेल्या कोरड्या वातावरणामुळे थंडी चांगलीच वाढली आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा पुन्हा आठ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. येत्या चार ते पाच दिवस थंडी कायम राहणार आहे. सोमवारी (ता.२५) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथे नीचांकी ८.५ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंदविले गेले असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसापासून मराठवाडा ते बिहारचा पश्चिम भाग या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. हा पट्टा झारखंड, छत्तीसगड आणि विदर्भ या दरम्यान असून समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. मात्र, हा पट्टा फारसा सक्रिय नसल्याने राज्यातील अनेक भागात हवामान कोरडे आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात थंडी कमीअधिक स्वरूपात आहे. मागील दोन दिवसात किमान तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत होते. परंतु थंडी वाढल्याने त्यात पुन्हा किमान तापमानात घट झाली आहे.
राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात थंडी असून किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. कोकणात बऱ्यापैकी थंडी असल्याने किमान तापमान १५ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक, जळगाव भागात चांगलीच थंडी आहे. त्यामुळे किमान तापमान जवळपास अंश सेल्सिअसपेक्षा खाली उतरले आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर भागातही किंचित थंडी आहे. मराठवाड्यात थंडी कमीअधिक प्रमाणात आहे. त्यामुळे किमान तापमान १४ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. विदर्भातही काही प्रमाणात थंडी आहे. त्यामुळे किमान तापमान १४ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.
शहरातील किमान तापमान (कंसात वाढ, घट झालेले तापमान)
- मुंबई (सांताक्रुझ) १६.४
- ठाणे १८.०
- अलिबाग १५.९ (-१)
- रत्नागिरी १९.२ (१)
- डहाणू १८.२ (१)
- पुणे १३.६ (३)
- जळगाव १०.० (-२)
- कोल्हापूर १९.४ (४)
- महाबळेश्वर १६.४ (३)
- मालेगाव १२.२ (१)
- नाशिक १०.४
- निफाड ८.५
- सांगली १८.२ (४)
- सातारा १९.४ (४)
- सोलापूर १७.५ (१)
- औरंगाबाद १४.५ (२)
- बीड १७.३ (३)
- परभणी १७.१ (२)
- परभणी कृषी विद्यापीठ १४.२
- नांदेड १८.५ (५)
- उस्मानाबाद १६.४ (१)
- अकोला १५.५ (२)
- अमरावती १६.३ (१)
- चंद्रपूर १८.४ (३)
- गोंदिया १४.५ (१)
- नागपूर १५.२ (१)
- वर्धा १५.४ (१)
- यवतमाळ १४.० (-२)
- 1 of 670
- ››