नागपूर ः रंगीत कापसाच्या उत्पादनाचे स्वप्न संशोधन संस्थांकडून रंगविण्यात आले असले, तरी सं
बातम्या
खानदेशातून थंडी गायब
खानदेशात गेल्या तीन-चार दिवसांपासून पुन्हा ढगाळ वातावरण आहे. थंडी गायब झाली आहे. सौम्य थंडी व दिवसा उकाडा अशी स्थिती आहे. यामुळे रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
जळगाव ः खानदेशात गेल्या तीन-चार दिवसांपासून पुन्हा ढगाळ वातावरण आहे. थंडी गायब झाली आहे. सौम्य थंडी व दिवसा उकाडा अशी स्थिती आहे. यामुळे रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
रब्बी पिकांसाठी यंदा हवे तसे किंवा पोषक वातावरण नसल्याची स्थिती आहे. पिकांची वाढ तशी समाधानकारक नाही. कारण सुरुवातीपासून थंडी हवी तशी नाही. त्यात १८ ते २१ नोव्हेंबरदरम्यान पाऊस झाला. डिसेंबरमध्ये ८ ते ११ तारखेदरम्यान पाऊस झाला. नंदुरबार, धुळे, जळगाव सर्वत्र कमी अधिक पाऊस झाला. तसेच नोव्हेंबर, डिसेंबर व अर्धा जानेवारी महिना या कालावधीत थंडीचे दिवस अत्यल्प आहेत. कमाल दिवस ढगाळ व प्रतिकूल वातावरण राहिले आहे.
केळी पिकात करपा रोगाचा अटकाव करण्यासाठी शेतकरी फवारण्या घेत आहेत. गेल्या २० ते २५ दिवसांत दोनदा फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. हरभरा पिकातही शेतकरी फवारणी करत आहेत. गहू पिकाला थंडी हवी असते. परंतु हुडहुडी भरविणारी थंडी यंदा पडलीच नाही. नोव्हेंबरमध्ये दोन दिवस नऊ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान होते. तर डिसेंबरमध्येही किमान तापमान फक्त तीन दिवस नऊ अंश सेल्सीअस एवढे झाले.
या महिन्यात एकच दिवस किमान तापमान नऊ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. उर्वरित दिवस किमान तापमान १४ ते १५ अंश सेल्सीअस किंवा यापेक्षा अधिक राहिले आहे. यामुळे शेतकऱ्यांना थंडीची प्रतीक्षा कायम राहीली.
कोरडवाहू पिकांमध्ये ज्वारी, हरभऱ्याच्या क्षेत्रात ओलावा नाहीसा झाला. यामुळे अनेकांना पिकांचे सिंचन करावे लागले आहे. ढगाळ वातावरणाचा धसका केळी उत्पादकांनी घेतला आहे. पाऊस आल्यास केळीची काढणी रखडून दर पडण्याची भीती आहे. तसेच पपई पिकालाही या प्रतिकूल स्थितीचा फटका सतत बसत राहिला आहे.
- 1 of 1538
- ››