Agriculture news in Marathi Cold disappears from Khandesh | Agrowon

खानदेशातून थंडी गायब

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 जानेवारी 2021

खानदेशात गेल्या तीन-चार दिवसांपासून पुन्हा ढगाळ वातावरण आहे. थंडी गायब झाली आहे. सौम्य थंडी व दिवसा उकाडा अशी स्थिती आहे. यामुळे रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

जळगाव ः खानदेशात गेल्या तीन-चार दिवसांपासून पुन्हा ढगाळ वातावरण आहे. थंडी गायब झाली आहे. सौम्य थंडी व दिवसा उकाडा अशी स्थिती आहे. यामुळे रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

रब्बी पिकांसाठी यंदा हवे तसे किंवा पोषक वातावरण नसल्याची स्थिती आहे. पिकांची वाढ तशी समाधानकारक नाही. कारण सुरुवातीपासून थंडी हवी तशी नाही. त्यात १८ ते २१ नोव्हेंबरदरम्यान पाऊस झाला. डिसेंबरमध्ये ८ ते ११ तारखेदरम्यान पाऊस झाला. नंदुरबार, धुळे, जळगाव सर्वत्र कमी अधिक पाऊस झाला. तसेच नोव्हेंबर, डिसेंबर व अर्धा जानेवारी महिना या कालावधीत थंडीचे दिवस अत्यल्प आहेत. कमाल दिवस ढगाळ व प्रतिकूल वातावरण राहिले आहे.

केळी पिकात करपा रोगाचा अटकाव करण्यासाठी शेतकरी फवारण्या घेत आहेत. गेल्या २० ते २५ दिवसांत दोनदा फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. हरभरा पिकातही शेतकरी फवारणी करत आहेत. गहू पिकाला थंडी हवी असते. परंतु हुडहुडी भरविणारी थंडी यंदा पडलीच नाही. नोव्हेंबरमध्ये दोन दिवस नऊ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान होते. तर डिसेंबरमध्येही किमान तापमान फक्त तीन दिवस नऊ अंश सेल्सीअस एवढे झाले.

या महिन्यात एकच दिवस किमान तापमान नऊ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. उर्वरित दिवस किमान तापमान १४ ते १५ अंश सेल्सीअस किंवा यापेक्षा अधिक राहिले आहे. यामुळे शेतकऱ्यांना थंडीची प्रतीक्षा कायम राहीली.

कोरडवाहू पिकांमध्ये ज्वारी, हरभऱ्याच्या क्षेत्रात ओलावा नाहीसा झाला. यामुळे अनेकांना पिकांचे सिंचन करावे लागले आहे. ढगाळ वातावरणाचा धसका केळी उत्पादकांनी घेतला आहे. पाऊस आल्यास केळीची काढणी रखडून दर पडण्याची भीती आहे. तसेच पपई पिकालाही या प्रतिकूल स्थितीचा फटका सतत बसत राहिला आहे.


इतर बातम्या
थंडीचा प्रभाव घटण्यास प्रारंभ पुणे ः अरबी समुद्राच्या परिसरात चक्रीय स्थिती...
केंद्र सरकारकडून ‘पीजीआर’ला मान्यता पुणे : शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जैव उत्तेजकांना...
शासकीय हरभरा खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
बंद आठवडी बाजाराचा कांदा उत्पादकांना...जळगाव ः जळगाव जिल्ह्यात आठवडी बाजार ६ मार्चपर्यंत...
बत्तीसशे चौरस फुटांपर्यंतच्या ...मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२००...
महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी ‘...रत्नागिरी ः पर्यटन व्यवसायातून महिलांना रोजगार...
कापडण्यात कांद्याला फटकाकापडणे, जि. धुळे : पावसाळ्यात सलग तीन महिने पाऊस...
परभणी जिल्ह्यात अवकाळीने हरभरा, ज्वारी...परभणी ः जिल्ह्यात या महिन्यात झालेला अवकाळी पाऊस...
मारुती माळ येथे टस्कराचे दर्शनकोल्हापूर ः बाळेघोल (ता. कागल) येथील जंगलातून...
मराठवाड्यात अवकाळीने ३३ टक्के पिकांचे...औरंगाबाद : अठरा व १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या...
नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्तांसाठी...नांदेड : जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे २०२० या...
निम्न पेढी प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण...अमरावती : निम्न पेढी प्रकल्प हा अमरावती व अकोला...
...तर खंडणीचे गुन्हे दाखल करा ः गरडपुणे ः ‘‘पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली...
सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा...कोल्हापूर ः राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून...
बाजार समित्यांनी पेट्रोल, सीएनजी पंप...परभणी ः उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने जिल्हा...
जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटची ‘गिनेस...जळगाव :  जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष...
सातारा जिल्ह्यात ५५ टक्के क्षेत्रावर...सातारा ः जिल्ह्यात २५ फेब्रुवारीअखेर तीन हजार १५४...
राज्यात ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे...नगर ः राज्यात यंदाही उसाचे जोरदार गाळप सुरू आहे....
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा...नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी...