agriculture news in Marathi cold down due to cloudy weather Maharashtra | Agrowon

ढगाळ हवामानामुळे गारठा कमीच

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा अभाव, ढगाळ हवामानामुळे राज्यात गारठा कमी झाला आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाडाही काहीसा वाढला आहे. गुरुवारी (ता. २३) धुळे यथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शनिवारनंतर (ता. २५) किमान तापमानात २ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यता आहे.

पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा अभाव, ढगाळ हवामानामुळे राज्यात गारठा कमी झाला आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाडाही काहीसा वाढला आहे. गुरुवारी (ता. २३) धुळे यथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शनिवारनंतर (ता. २५) किमान तापमानात २ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यता आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. तर समुद्रावरून महाराष्ट्रात येणाऱ्या उष्ण व दमट वाऱ्यामुळे हवामान ढगाळ होत आहे. राज्याच्या सर्वच भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा २ ते ६ अंशांपर्यंत वाढ झाली आहे. दोन दिवस हीच स्थिती राहणार असून, शनिवारनंतर राज्याच्या तापमानात २ ते ४ अंशांची घट होत, गारठा पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. २३) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १४.१ (३), धुळे १३.६, जळगाव १७.२ (५), कोल्हापूर १७.६ (२), महाबळेश्‍वर १५.२ (१), मालेगाव १६.८ (६), नाशिक १५.० (५), निफाड १३.८, सांगली १६.४ (२), सातारा १४.४ (२), सोलापूर १७.८ (१), अलिबाग २०.६ (३), डहाणू १९.६ (३), सांताक्रूझ १९.४ (३), रत्नागिरी २०.६ (२), औरंगाबाद १५.५ (३), परभणी १६.१ (१), नांदेड १७.५ (४), अकोला १८.२ (४), अमरावती १७.० (३), बुलडाणा १८.४ (४), चंद्रपूर १७.२ (२), गोंदिया १६.२(३), नागपूर १७.४(४), वर्धा १८.४ (४), यवतमाळ १८.०(२).

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...
जलयुक्त फेल, पुढे काय?उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...
पीकविमा हप्त्यापोटी पाचशे कोटी वितरणास...मुंबई ः पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०१९...
मोसंबी क्लटरमध्ये शाश्‍वत उत्पादन,...औरंगाबाद : मोसंबी उत्पादकांसाठी उत्पन्नाची...
डाळिंब उत्पादनात ३० टक्के घटसांगली ः सुरुवातीला दुष्काळी परिस्थिती, त्यानंतर...
कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्रीचे १५०...पुणे : कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
कहर ‘कोरोना’चाकोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे...