राज्यात गारठा कमी, उकाडा वाढला

cold decreased
cold decreased

पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाल्याने राज्यातील थंडी कमी झाली आहे. तर कमाल व किमान तापमानाचा पारा सरासरीच्या वर गेल्याने, ढगाळ हवामानासह उकाडाही जाणवत आहे. मंगळवारी (ता. २१) धुळे यथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ११.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.     उत्तरेकडून वाहणारे प्रवाह खंडित झाल्याने, तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्य उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात अंशत: ढगाळ हवामान होत आहे. शुक्रवारी (ता. १७) निफाड येथे तापमान २.४ अंशांपर्यंत घसरले होते. तर मंगळवारी (ता. २१) तेथे किमान तापमान १२.४ अंशांवर गेले होते. कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमान १५ अंशांच्या पुढे गेले आहे. तर विदर्भात तापमान १५ अंशांच्या आसपास आहे. किमान तापमानातील वाढ आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.     मंगळवारी (ता. २१) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १५.२ (४), नगर १५.५ (४), धुळे ११.६, जळगाव १४.६ (२), कोल्हापूर २०.५ (०), महाबळेश्‍वर १६ (२), मालेगाव १५.६ (५), नाशिक १३.५ (३), निफाड १२.४, सांगली १९.३ (५), सातारा १७ (४), सोलापूर २० (३), अलिबाग १९.४ (२), डहाणू १७.४ (०), सांताक्रूझ १९ (२), रत्नागिरी २० (२), औरंगाबाद १५.९ (३), परभणी १६.१ (१), नांदेड १७ (३), उस्मानाबाद १३.४ (-२), अकोला १४.९ (१), अमरावती १४ (-१), बुलडाणा १६.६ (२), चंद्रपूर १५.२ (०), गोंदिया १३.५ (०), नागपूर ११.९ (-२), वर्धा १४.४ (१), यवतमाळ १६ (१).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com