agriculture news in Marathi cold fall in state, temperature increased Maharashtra | Agrowon

राज्यात गारठा कमी, उकाडा वाढला

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 जानेवारी 2020

पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाल्याने राज्यातील थंडी कमी झाली आहे. तर कमाल व किमान तापमानाचा पारा सरासरीच्या वर गेल्याने, ढगाळ हवामानासह उकाडाही जाणवत आहे. मंगळवारी (ता. २१) धुळे यथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ११.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.   

पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाल्याने राज्यातील थंडी कमी झाली आहे. तर कमाल व किमान तापमानाचा पारा सरासरीच्या वर गेल्याने, ढगाळ हवामानासह उकाडाही जाणवत आहे. मंगळवारी (ता. २१) धुळे यथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ११.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.   

उत्तरेकडून वाहणारे प्रवाह खंडित झाल्याने, तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्य उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात अंशत: ढगाळ हवामान होत आहे. शुक्रवारी (ता. १७) निफाड येथे तापमान २.४ अंशांपर्यंत घसरले होते. तर मंगळवारी (ता. २१) तेथे किमान तापमान १२.४ अंशांवर गेले होते.

कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमान १५ अंशांच्या पुढे गेले आहे. तर विदर्भात तापमान १५ अंशांच्या आसपास आहे. किमान तापमानातील वाढ आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.  
 
मंगळवारी (ता. २१) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १५.२ (४), नगर १५.५ (४), धुळे ११.६, जळगाव १४.६ (२), कोल्हापूर २०.५ (०), महाबळेश्‍वर १६ (२), मालेगाव १५.६ (५), नाशिक १३.५ (३), निफाड १२.४, सांगली १९.३ (५), सातारा १७ (४), सोलापूर २० (३), अलिबाग १९.४ (२), डहाणू १७.४ (०), सांताक्रूझ १९ (२), रत्नागिरी २० (२), औरंगाबाद १५.९ (३), परभणी १६.१ (१), नांदेड १७ (३), उस्मानाबाद १३.४ (-२), अकोला १४.९ (१), अमरावती १४ (-१), बुलडाणा १६.६ (२), चंद्रपूर १५.२ (०), गोंदिया १३.५ (०), नागपूर ११.९ (-२), वर्धा १४.४ (१), यवतमाळ १६ (१).


इतर बातम्या
सरदारांच्या वंशजांकडून शिवछत्रपतींना ८५...पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला ‘जिजाऊ शहाजी...
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
शेतमजुराच्या मुलीने पटकावला ‘शिवछत्रपती...अकोला ः प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एका खेड्यातील...
साडेआठ हजार कोटी खर्चूनही 'जलयुक्त' फेल...मुंबई : फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी जलयुक्त...
पीक विमा योजना यापुढे ऐच्छिक; केंद्र...नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
नगर जिल्ह्यामध्ये कमी पाण्यावरील फळझाडे...नगर : पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करताना...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...