agriculture news in Marathi cold gone due to cloudy weather Maharashtra | Agrowon

ढगाळ हवामानामुळे थंडी गायब

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

पुणे : राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामानाची स्थिती तयार झाली आहे. यामुळे राज्यातील गारठा कमी झाला आहे. किमान तापमानात वाढ झाली आहे. पुढील तीन ते चार दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. यामुळे मध्य कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात वादळी पाऊस व मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

पुणे : राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामानाची स्थिती तयार झाली आहे. यामुळे राज्यातील गारठा कमी झाला आहे. किमान तापमानात वाढ झाली आहे. पुढील तीन ते चार दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. यामुळे मध्य कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात वादळी पाऊस व मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात कमी दाबाचे क्षेत्र, तर हिंदी महासागरात चक्रावाताची स्थिती तयार झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान तयार झाले आहे. परिणामी राज्यातील अनेक भागात पहाटेचा गारठा कमी झाला असून किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ असल्याने गारठा कमी अधिक प्रमाणात आहे. सोमवारी (ता.२३) सकाळी निफाड आणि उस्मानाबाद येथे १२.४ अंश सेल्सिअसची सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. 

दोन दिवसांपूर्वी हवामान काही प्रमाणात कोरडे झाल्याने राज्यात गारठा वाढला होता. त्यामुळे किमान तापमानात चांगलीच घट होऊन दहा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली आले होते. मात्र, रविवारपासून (ता. २२) पुन्हा हवामान ढगाळ झाले आहे. सायंकाळी पुणे परिसरातील वाघोली, कोथरूड या भागात पावसाचे तुरळक थेंब पडले होते. नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागात हवामान ढगाळ असल्याने गारठा कमी झाला आहे. त्यामुळे तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. मात्र, निफाड तालुक्याच्या परिसरात किंचित गारठा असल्याने तापमान बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. 

कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर परिसरात हवामान ढगाळ आहे. यामुळे काही प्रमाणात गारठा कमी झाला आहे. परिणामी किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली असून किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

या भागात आणखी काही दिवस किमान तापमान असेच राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात गारठा चांगलाच कमी झाला आहे. त्यामुळे किमान तापमान १२ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मराठवाड्यातही ढगाळ हवामानामुळे गारठा गायब झाला आहे. किमान तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअसपर्यंत होते. विदर्भातील अनेक भागात गारठा कमी झाला आहे. यामुळे चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, अमरावती, वर्धा, यवतमाळ या भागातील तापमान १५ ते १८ अशं सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. 

सोमवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः 
अकोला १७.९ (४), अलिबाग २२.५ (४), अमरावती १७.६ (३), औरंगाबाद १६.८ (५), बीड १८.८ (५), बुलढाणा १७.० (३), चंद्रपूर १५.२ (२), डहाणू २३.२ (५), गोंदिया १५.४(२), जळगाव १७.४ (६), कोल्हापूर १९.७ (५), महाबळेश्वर १५.५ (२), मालेगाव १८.५ (८), धुळे कृषी महाविद्यालय १३.०, मुंबई २२.२ (४), नागपूर १७.५ (३), नांदेड १५.० (३), नाशिक १७.२ (७), निफाड १२.४, उस्मानाबाद १२.४ (-१), परभणी १८.० (५), परभणी कृषी विद्यापीठ १७.५, लोहगाव १८.३ (७), पाषाण १७.३ (६), पुणे १६.९ (६), रत्नागिरी २३.९ (४), सांगली १९.१ (५), सातारा १९.५ (७), सोलापूर १९.० (३), ठाणे २२.१, वर्धा १८.६ (५), यवतमाळ १९.४ (५) 
 


इतर अॅग्रो विशेष
स्पेनच्या राजकन्येचा कोरोनामुळे मृत्यू...माद्रीद : स्पेनच्या राजकन्या मारीया टेरेसा यांचा...
राज्यात १२ नवे कोरोना रुग्ण, बाधितांची...मुंबई: राज्यात १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...
पुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती...पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही...
पुणे बाजार समिती आजपासून सुरु; मात्र...पुणे : कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या...
देशातील वस्त्रोद्योगाला दोन लाख कोटींचा...जळगाव ः देशात शेतीनंतर रोजगाराचा व आर्थिक...
राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या १८१;...मुंबई : राज्यात शनिवारी (ता.२९) आणखी २८ कोरोना...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी राज्यभर...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना फळे व...
नगर जिल्हा बॅंकेने दिले कर्जवसुलीचे...नगर ः कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी करण्यासाठी...
नगर, पुणे, सोलापूरात हजारवर वाहतूक...पुणे ः शहरांमध्ये भाजीपाला, फळे, दुध अशा...
राज्यात पुर्वमोसमी पावसाचा आजही अंदाज पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुर्वमोसमी...
वसंतदादा कारखान्याकडून सॅनिटायझरची...सांगली  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
जागतिक अर्थव्यवस्था भीषण मंदीच्या...वॉशिंग्टनः कोरोना महामारीमुळे जागतिक...
साखर उद्योगासमोर कच्च्या मालाची समस्या पुणे: देशातील साखर कारखान्यांकडे कच्चा माल नेणारी...
सॅनिटायझर्ससाठी ४५ साखर कारखाने,...कोल्हापूर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने...
वाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती  ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...
देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...
भाजीपाला विक्रीसाठी पुणे जिल्ह्यात...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील...
राज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत...
मासे, मत्स्यबीज, मत्स्यखाद्याच्या...मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे...