Agriculture news in Marathi The cold grew in North India | Agrowon

उत्तर भारतात गारठा शिगेला

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

उत्तर भारतामध्ये थंडीची तीव्र लाट आली असून उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाना आणि पंजाबसह अन्य राज्ये गारठली आहेत. राजस्थानातील सिकरमध्ये ४ अंश सेल्सिअस तर, जम्मू- काश्‍मीरच्या काही भागांतील तापमान हे शून्याच्याही खाली गेले आहे. 

नवी दिल्ली ः उत्तर भारतामध्ये थंडीची तीव्र लाट आली असून उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाना आणि पंजाबसह अन्य राज्ये गारठली आहेत. राजस्थानातील सिकरमध्ये ४ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली असून, जम्मू- काश्‍मीरच्या काही भागांतील तापमान हे शून्याच्याही खाली गेले आहे. काश्‍मीर खोऱ्यातील ही स्थिती ख्रिसमसपर्यंत कायम राहू शकते असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

नंदनवनाची राजधानी असलेल्या श्रीनगरचा पारा उणे पाच अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. दक्षिण काश्‍मीरमधील पहलगाममध्येही तो उणे ५.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. गुलमर्गमध्ये उणे सहा अंश सेल्सिअस एवढ्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. हरियाना आणि पंजाबमधील हिसार, आदमपूर आणि लुधियाना या भागांत थंडीची लाट अधिक तीव्र झाली आहे. हरियानाच्या हिसारचा पारा २.७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. आदमपूर आणि लुधियानामध्येही तीव्र थंडी होती.

दृश्‍यमानता खालावली
पंजाबमधील अमृतसर, पतियाळा, फरीदकोट, हलवाडा, भटिंडा या ठिकाणांवर तीव्र थंडी असून, सरासरी दृश्‍यमानता देखील खालावली आहे. हरियानातील अंबाला, कर्नाल, नारनौल, रोहतक, भिवानी आणि सिरसा शहरांमधील तापमान आणखीन खालावले आहे. चंडीगडचा पारा ५.७ (अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे.

 


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...