agriculture news in Marathi cold increased in in east vidarbha Maharashtra | Agrowon

पूर्व विदर्भात थंडी वाढली

टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

गेल्या आठवड्यापासून राज्यात थंडीस सुरुवात झाली आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागांत थंडी वाढली आहे. शुक्रवारी (ता.६) यवतमाळ, गोंदियात १२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानात घट झाली आहे. 

पुणे ः गेल्या आठवड्यापासून राज्यात थंडीस सुरुवात झाली आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागांत थंडी वाढली आहे. शुक्रवारी (ता.६) यवतमाळ, गोंदियात १२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानात घट झाली आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत परभणी कृषी विद्यापीठ येथे ११.० अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सध्या दिवसभर ऊन पडत असले, तरी सायंकाळनंतर हवेत काही प्रमाणात गारवा तयार होत आहे. विदर्भातील अनेक भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते सहा अंश सेल्सिअसपर्यंत घट होऊन ११ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली आले आहे. तर चंद्रपूर येथे ११.६ अंश सेल्सिअस तर यवतमाळ, गोंदिया, या भागांत १२ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला आहे. मराठवाड्यातही थंडीने चांगलेच हातपाय पसरले आहेत. परभणी कृषी विद्यापीठानंतर परभणी शहरातही चांगलीच थंडी होती. औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद या भागांतही थंडी वाढली असून, किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे.

अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा खाली आले आहे.
मध्य महाराष्ट्र व खानदेशातही थंडी वाढली आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये १२ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदविले गेले. तर पुणे, महाबळेश्वर, नाशिक, जळगाव, सोलापूर या भागांतही किमान तापमानात चांगलीच घसरण झाली आहे. या भागात सरासरीच्या तुलनेत दोन ते चार अंश सेल्सिअसने घट झाली आहे. कोकणातील अनेक भागांत थंडीत वाढ होऊ लागली आहे. मुंबई, रत्नागिरी, अलिबाग, डहाणू येथील किमान तापमानात घट झाली असून, पारा २० अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे.

शुक्रवारी (ता.६) सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्येः
मुंबई (सांताक्रूझ) २१ (-१), अलिबाग २०.९ (-१), ठाणे २४.०, रत्नागिरी २०.० (-२), डहाणू २२ (-१), पुणे १३.८ (-२), जळगाव १३.६ (-३), कोल्हापूर १७.६ (-१), महाबळेश्वर १४.६ (-१), मालेगाव १५.६(-१), नाशिक १३.७ (-२), निफाड १२.०, सांगली १६.४ (-२), सातारा १४.९ (-२), सोलापूर १५.३ (-४), औरंगाबाद १५.० (-१), बीड १९.४(३), परभणी १२.४ (-५), परभणी कृषी विद्यापीठ ११.०, नांदेड १६.० (-२), उस्मानाबाद १५.० (-२) अकोला १५.० (-३), अमरावती १३.७ (-४), बुलडाणा १६.० (-२), चंद्रपूर ११.६ (-६), गोंदिया १२.० (-६), नागपूर १३.६ (-३), वर्धा १४.६ (-३), यवतमाळ १२.५ (-५).
 


इतर अॅग्रो विशेष
दिशा कार्यक्षम पूर व्यवस्थापनाची!महाराष्ट्र देशी सध्या अतिवृष्टी आणि ...
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
पीक विम्यात चुकीचे प्रकार खपवून घेणार ...नाशिक: पीकविमा कंपन्यांकडून पाच पाच जिल्ह्यांसाठी...
केंद्राच्या काळ्या कायद्यांची आम्हाला...नवी दिल्ली ः कायद्याच्या प्रक्रियेतून न आलेल्या...
धरण क्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात...
राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी...पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने...
हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे...
कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली...
राज्याची फळबाग लागवड योजना बंद नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या...
विना नांगरणी तंत्राने कपाशी, तुरीची शेतीदेवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील,...
हिंमत, परिश्रमातून पूर्णाबाईंनी साधली...शिरेगाव (जि. नगर) येथील अल्पभूधारक पूर्णाबाई होन...
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...