agriculture news in Marathi cold increased but eggs rate slaps Maharashtra | Agrowon

नागपूर : थंडीची तीव्रता वाढली; अंडी दरात सुधारणा नाही

विनोद इंगोले
शनिवार, 18 जानेवारी 2020

पोल्ट्री व्यावसायिकांच्या अडचणींबाबत लवकरच सरकारमधील मंत्र्यांशी संवाद साधण्याचे प्रस्तावित आहे. त्याकरिता नियोजन केले जात आहे. शासकीय गोदामात असलेले धान्य मिळावे, अशी मागणी आहे. त्यामुळे बाजारातील खाद्याचे दर नियंत्रणात येतील.
- श्‍याम भगत, संचालक, नॅशनल एग्ज कोआॅर्डिनेशन कमिटी

नागपूर ः थंडीच्या दिवसांत मागणी वाढत अंड्यांचे दरही वाढतात. या वर्षी मात्र पहिल्यांदाच थंडीची तीव्रता वाढली असली, तरी अंड्यांचे दर मात्र खाली आल्याने अंडी उत्पादक अडचणीत आले आहेत. शासनाने याविषयी हस्तक्षेप करण्याची मागणी पोल्ट्री व्यावसायिकांची असून, यासंदर्भाने लवकरच एक शिष्टमंडळ सत्ताधाऱ्यांना भेटणार आहे.

राज्यात इतर ऋतूंऐवजी हिवाळ्यात अंड्यांना मागणी वाढते. त्यामुळेच दरातही तेजी येते, असा दरवर्षीचा पोल्ट्री उद्योगाचा अनुभव आहे. या वर्षी दरात तेजी येण्याऐवजी उत्पादकता खर्चाची भरपाईच अशक्‍य झाल्याने पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले आहेत. शेकडा (१०० नगामागे) सरासरी ६० रुपयांची घसरण झाल्याचे सांगण्यात आले.

थंडीपूर्वी राज्यात अंड्यांचे दर ५१९ रुपये शेकडा होते; ते आता ४६० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. हैदराबाद मार्केटचे दर ४५५ वरून ४०५ पर्यंत खाली आले आहेत, असेही पोल्ट्री व्यावसायिक क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले.

राज्याची रोजची अंड्यांची मागणी २ कोटी नगांची आहे. यातील १ कोटी २० लाख अंड्यांचे उत्पादन महाराष्ट्रात होते. अंडी उत्पादनात सरासरी ८० लाखांचा वाटा पुणे जिल्ह्याचा आहे. दहा लाख अंडी उत्पादन विदर्भातील अमरावती जिल्ह्यात, तर दोन लाखांवर अंडी उत्पादन नागपूर जिल्ह्याचे आहे. हैदराबादवरून ५५ लाख अंडी येतात, तर कर्नाटक तसेच तमिळनाडूमधून १५ लाख अंडी येतात. याप्रमाणे बहुतांश गरज भागत असली, तरी काही प्रमाणात तुटवडा भासतो, असेही सांगण्यात आले.

दरवर्षी थंडीच्या दिवसांत दर वधारत १०० नगांसाठी ५०० रुपयांपर्यंत ते पोचतात. या वेळी खरेदीदारांकडून उठाव नसल्याने दर ४६० व त्यापेक्षाही खाली आले आहेत. १०० अंड्यांचा उत्पादन खर्च ४३० रुपये आहे. दरातील घसरणीपायी उत्पादकता खर्चाची भरपाईदेखील शक्‍य होत नसल्याचे पोल्ट्री व्यावसायिकांनी सांगितले. त्यातच पोल्ट्री खाद्याच्या दरातील तेजीचाही उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

प्रतिक्रिया
सोयाबीन ढेप ३८ हजार रुपये टन असून, त्यावर ५ टक्‍के जीएसटी आकारली जाते. मका २० रुपये किलो, ब्रोकन राइस १८८ रुपये किलो, सूर्यफूल ढेप २५ रुपये किलो, तांदूळ कोंडा १६ रुपये किलो आणि वाहतूक खर्च अशाप्रकारे पोल्ट्री खाद्य महागले आहे. त्यातच अंड्यांच्या दरात झालेली घसरण पाहता उत्पादकता खर्चाचीदेखील भरपाई होत नाही.
- रवींद्र मेटकर, पोल्ट्री व्यावसायिक, अमरावती

 


इतर अॅग्रो विशेष
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...
जलयुक्त फेल, पुढे काय?उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...
पीकविमा हप्त्यापोटी पाचशे कोटी वितरणास...मुंबई ः पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०१९...
मोसंबी क्लटरमध्ये शाश्‍वत उत्पादन,...औरंगाबाद : मोसंबी उत्पादकांसाठी उत्पन्नाची...
डाळिंब उत्पादनात ३० टक्के घटसांगली ः सुरुवातीला दुष्काळी परिस्थिती, त्यानंतर...
कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्रीचे १५०...पुणे : कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
कहर ‘कोरोना’चाकोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे...