agriculture news in Marathi cold increased in Khandesh Maharashtra | Agrowon

खानदेशात गारठा वाढला 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 जानेवारी 2021

उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली आहे. यामुळे खानदेशातील अनेक भागांत थंडी वाढली आहे. मध्य महाराष्ट्रातही किंचित थंडी असून कोकण, मराठवाडा व विदर्भात थंडी कमी झाली आहे. 

पुणे ः उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली आहे. यामुळे खानदेशातील अनेक भागांत थंडी वाढली आहे. मध्य महाराष्ट्रातही किंचित थंडी असून कोकण, मराठवाडा व विदर्भात थंडी कमी झाली आहे. बुधवारी (ता. २०) सकाळी आठ वाजेपर्यंत जळगाव येथे नीचांकी ११.४ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

गेल्या दोन दिवसांपासून उत्तर प्रदेश ते उत्तर कोकण व उत्तर मध्य प्रदेश या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तसेच बंगाल उपसागराच्या नैर्ऋत्य भागात आणि हिंदी महासागराच्या परिसरात चक्रीय वाऱ्यासाठी समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे.

कोकण, मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांत थंडी कमी झाली झाली असून, किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत जवळपास सहा अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांनंतर राज्यात हवामान कोरडे राहील. त्यामुळे थंडीत किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. 

उत्तर भारतातील पंजाब, हरियाना, चंडीगड आणि पश्‍चिम राजस्थान या भागांत आज थंडीची अति तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे किमान तापमानात चांगलीच घट होण्याची शक्यता आहे. पश्‍चिम राजस्थानमधील पिलानी येथे ४.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. तर राज्यात जळगावमध्ये सर्वांत कमी तापमान होते. निफाड, नाशिक, नगर भागांतही चांगलीच थंडी होती. कोकणात किमान तापमानाचा पारा १९ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्र ११ ते २०, मराठवाड्यात १४ ते १८ आणि विदर्भात १६ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते. 

बुधवारी (ता.२०) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः 

 • मुंबई (सांताक्रूझ) १९ (२) 
 • रत्नागिरी २१.५ (२) 
 • डहाणू १९.३ (२) 
 • पुणे १६.१ (५) 
 • जळगाव ११.४ (-१) 
 • कोल्हापूर २० (५) 
 • महाबळेश्‍वर १५.४ (२) 
 • मालेगाव १८.२ (६) 
 • नाशिक १४.६ (४) 
 • सांगली १८.१ (४) 
 • सातारा १७.४ (४) 
 • सोलापूर १७.९ (२) 
 • औरंगाबाद १६.९ (५) 
 • बीड १८.८ (५) 
 • परभणी १८ (४) 
 • नांदेड १८ (४) 
 • उस्मानाबाद १६.६ (२) 
 • अकोला १८.६ (४) 
 • अमरावती १८.५ (४) 
 • बुलडाणा १७ (२) 
 • चंद्रपूर १६.८ (१) 
 • गोंदिया १६.८ (४) 
 • नागपूर १९.५ (६) 
 • वर्धा १८.६ (५) 
 • यवतमाळ १७ (२) 

इतर अॅग्रो विशेष
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...
शेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंडनांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार...
कोकणात पावसाचा जोर कायमपुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाजपुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर...
पाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
सेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा...नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....