हुडहुडी वाढली

हुडहुडी वाढली
हुडहुडी वाढली

पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात गारठा चांगलाच वाढला आहे. तापमान १० अंशांच्या खाली घसरल्याने नाशिक, औरंगाबादमध्येही हुडहुडी वाढली आहे. नगर येथे पारा आणखी घसरून बुधवारी (ता. १२) हंगामातील नीचांकी ८.२ अंशांवर आला आहे. राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून, गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पावसाला पोषक हवामान निवळल्यानंतर राज्यात आकाश निरभ्र झाले आहे. किमान तापमानात घट होऊन, गारठा पुन्हा वाढला आहे. राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास असून, काही ठिकाणी १ ते ५ अंशांची घट झाली आहे. पुणे, जळगाव, सातारा, नागपूर येथे किमान तापमान ११ अशांच्या खाली आल्याने तेथेही थंडी वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ८.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली तर महाबळेश्‍वरच्या वेण्णा लेक परिसरात तापमानात मोठी घट झाल्याने दवबिंदू गोठल्याचे पाहायला मिळाले. बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याची तीव्रता वाढत आहे. उत्तरेकडे सरकत असलेल्या प्रणालीचे कमी तीव्रतेच्या वादळात (डीप डिप्रेशन) रूपांतर होण्याचे संकेत आहेत. 

 शुक्रवारपर्यंत (ता. १४) ते दक्षिण अांध्र आणि उत्तर तमिळनाडूकडे येण्याची शक्यता आहे. श्रीलंका आणि तामिळनाडूलगत समुद्र खवळणार असल्याचे मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटकमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बुधवारी (ता. १२) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १०.५ (-१), नगर ८.२ (-४), जळगाव १०.० (-२), कोल्हापूर १५.८ (०), महाबळेश्‍वर १३.० (-५), मालेगाव ११.८ (१), नाशिक ९.६ (-१), सांगली १२.३ (-२), सातारा ११.२ (-२), सोलापूर १५.६ (०), सांताक्रूझ १८.४ (०), अलिबाग १८.७ (०), रत्नागिरी १५.८ (-५), डहाणू १८.७ (१), आैरंगाबाद ९.८ (-१), परभणी १३.२ (०), नांदेड १४.५ (-२), अकोला १२.३ (-१), अमरावती १३.२ (-२), बुलडाणा १२.६ (-२), चंद्रपूर १९.२ (-१), गोंदिया १४.५ (२), नागपूर १०.९ (-२), वर्धा १४.६ (१), यवतमाळ १४.४ (०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com