agriculture news in Marathi cold increased in state Maharashtra | Agrowon

राज्यभरात हुडहुडी वाढली 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 डिसेंबर 2020

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. त्याचा प्रभाव महाराष्ट्रातील वातावरणावर झाला असून राज्यातही गारठा वाढला आहे.

पुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. त्याचा प्रभाव महाराष्ट्रातील वातावरणावर झाला असून राज्यातही गारठा वाढला आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आवारात सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा घसरला. 

मंगळवारी (ता.२२) कृषी विद्यापीठ येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ५.१ अंश, तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यांमध्ये हिमवृष्टी होत आहे. यामुळे उत्तर भारतातील थंडीची तीव्र लाट आल्याने मध्य प्रदेशातील पंचमढी येथे मंगळवारी (ता. २२) देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने काही ठिकाणी थंड दिवस अनुभवाला येत आहेत. यामुळे दिवसभर पडणारे ऊन देखील ऊबदार वाटत आहे. 

सध्या उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातही कडाका वाढू लागला आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठापाठोपाठ परभणी शहरात ७.६ अंश, यवतमाळ येथे ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुणे, नगर, जळगाव, नाशिक, सातारा, औरंगाबाद येथे तापमानाचा पारा १० अंशापेक्षा खाली घसरला आहे. 

राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. विदर्भात ८ ते १२ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. तर मराठवाड्यात ५ते ११, मध्य महाराष्ट्रात ८ ते १४, कोकणात १६ ते १८ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. 

विदर्भात थंडीच्या लाटेची शक्यता 
उत्तर भारतातील थंडीने राज्यातील अनेक भागात जम बसविण्यास सुरूवात केली आहे. राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होत असून, काही भागात तापमानात एक ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस विदर्भात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगणा राज्यातही थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली. 

मंगळवारी (ता.२२) सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ः मुंबई (सांताक्रुझ) १६.० (-२), ठाणे १८.०, अलिबाग १६.५ (-२), रत्नागिरी १८.३ (-२), डहाणू १६.६ (-२), पुणे ९.२ (-२), नगर ८.१, जळगाव ९.० (-३), कोल्हापूर १४.५ (-१), महाबळेश्वर ११.३ (-२), मालेगाव १०.२(-१), नाशिक ८.४ (-२), निफाड ६.५, सांगली १२.६ (-२), सातारा ९.०(-४), सोलापूर १२.१ (-३), औरंगाबाद ९.२ (-२), बीड १०.१ (-३), परभणी ७.६ (-३), परभणी कृषी विद्यापीठ ५.१, नांदेड १०.० (-३), उस्मानाबाद ११.४ (-२), अकोला ९.६ (-४), अमरावती १२.५ (-२), बुलडाणा ११.० (-३), चंद्रपूर ९.६ (-३), गोंदिया ७.८ (-४), नागपूर ८.६ (-४), वर्धा १०.० (-३), यवतमाळ ८.५ (-६). 
 


इतर अॅग्रो विशेष
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
सिक्कीमचे ‘टेरेस फार्मिंग’ ठरतेय वरदानआशिया खंडामधील आनंदी नागरिकांचा देश म्हणजे भूतान...
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...