विदर्भात गारठा वाढला

cold
cold

पुणे  ः राज्यातील अनेक भागात हवामान कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ असल्याने गारठा कमी अधिक होत आहे. खान्देशनंतर विदर्भातही अनेक ठिकाणी गारठा वाढला आहे. येत्या काही दिवसांत गारठा वाढून चांगलीच थंडी वाढणार असल्याने किमान तापमानात आणखी घट होईल. शुक्रवारी (ता.२०) सकाळी विदर्भातील चंद्रपूर येथे १०.८ अंश सेल्सिअसची सर्वात कमी तापमानाची नोंद झाली, असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपूर्वी विदर्भाच्या काही भागात हवामान अंशत: ढगाळ असल्याने दुपारच्या उकाड्यात वाढ झाली होती. यामुळे हवेतील गारवा कमी होऊन तापमानात वाढ झाली होती. मात्र, विदर्भात पुन्हा हवामान कोरडे झाल्याने गारठ्यात वाढ झाली आहे. चंद्रपूरमध्ये सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात दोन अंश सेल्सिअसने घट झाली असून सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ निफाड येथेही ११.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. उर्वरित भागात गारठा कमी असल्याने तापमान १२ अंश सेल्सिअसच्या वर होते. कोकणात कोरडे हवामान असल्याने काही प्रमाणात गारठा वाढला असल्याने किमान तापमान २० ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. या भागात आणखी काही दिवस तापमान जवळपास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात गारठ्यात आणखी वाढ होईल. महाबळेश्वर, पुणे, नगर, सातारा या भागात गारठा आणखी वाढणार आहे. त्यामुळे तापमान आणखी कमी होणार आहे. सोलापूर, सांगली या भागात १७ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. मराठवाड्यातही गारठ्यात किंचित वाढ झाली आहे. यामुळे या भागात किमान तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. विदर्भातील अनेक भागात गारठा वाढला आहे. यामुळे चंद्रपूर, नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ या भागातील तापमानात घट झाली असून तापमान १० ते १६ अशं सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते.   शुक्रवारी (ता. २०) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः नगर १२.६ (१), अकोला १४.९ (२), अलिबाग २०.८ (३), अमरावती १५.४, औरंगाबाद १३.६ (२), बीड १५.५ (२), बुलढाणा १४.४, चंद्रपूर १०.८ (-२), डहाणू २०.६ (२), गोंदिया १३.०(१), जळगाव १५.० (३), कोल्हापूर १८.२ (३), महाबळेश्वर १३.४, मालेगाव १५.४ (४), धुळे कृषी महाविद्यालय १२.०, मुंबई २०.० (२), नागपूर १३.१ (१), नांदेड १५.० (३), नाशिक १३.० (३), नवी मुंबई १६.५,  निफाड ११.८, उस्मानाबाद १४.२ (१), परभणी १४.१ (१), लोहगाव १५.८ (३), पाषाण १४.३ (३), पुणे १४.१ (३), रत्नागिरी २३.२ (३), सांगली १७.१ (३), सातारा १५.४ (३), सोलापूर १९.० (४), ठाणे २२.५, वर्धा १५.९ (३), यवतमाळ १६.० (१.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com