agriculture news in Marathi cold in increased Vidarbha Maharashtra | Agrowon

विदर्भात गारठा वाढला

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

पुणे : आठवडाभर पावसाने हजेरी लावल्यानंतर विदर्भात गारठा वाढला आहे. तापमानाचा पारा वेगाने खाली घसरत, नागपूर येथे ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात सर्वच ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशांनी कमी झाले आहे. सोमवारी (ता. १०) धुळे येथील कृषी महाविद्यालयात ७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मात्र अनेक ठिकाणी ढगाळ हवामान असल्याने तापमानात मोठी वाढ झाली आहे. 

पुणे : आठवडाभर पावसाने हजेरी लावल्यानंतर विदर्भात गारठा वाढला आहे. तापमानाचा पारा वेगाने खाली घसरत, नागपूर येथे ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात सर्वच ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशांनी कमी झाले आहे. सोमवारी (ता. १०) धुळे येथील कृषी महाविद्यालयात ७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मात्र अनेक ठिकाणी ढगाळ हवामान असल्याने तापमानात मोठी वाढ झाली आहे. 

राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहेत. विदर्भात पावसाने उघडीप दिल्यानंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान झाले आहे. महाराष्ट्र आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे सोमवारी (ता. १०) सकाळी अनेक जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामान होते. तुरळक ठिकाणी पावसाने शिडकावा देखील केला. आज (ता. ११) राज्यात धुके पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या अनेक भागांत तापमानात १ ते ५ अंशांची वाढ झाली आहे. 

मराठवाड्यात मात्र तापमान सरासरीपेक्षा १ ते ३ अंशांची कमी झाले आहे. विदर्भात गारठा वाढला असून, अमरावती, गोंदिया, नागपूर येथे तापमान सरासरीपेक्षा ५ अंशांची कमी झाले आहे. नागपूर येथे तापमान १० अंशांच्या खाली आल्याने थंडीची लाट आल्याची स्थिती होती. राज्यात ढगाळ आकाशासह, हवामान मुख्यत: कोरडे राहणार आहे, तर तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवारी (ता. १०) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १६.९ (५), नगर १५.८ (३), धुळे ७.४, जळगाव १२.६ (-१), कोल्हापूर १९.४ (३), महाबळेश्‍वर १३.९ (०), मालेगाव १३.२ (२), नाशिक १३.६ (२), निफाड १२.८, सांगली २०.७ (५), सातारा १९.५ (५), सोलापूर १८.८ (१), डहाणू १९.५ (२), सांताक्रूझ २१.२ (३), रत्नागिरी २०.४ (१), औरंगाबाद १५.६ (२), परभणी १५.४ (-१), नांदेड १४.० (-१), उस्मानाबाद १२.८ (-३), अकोला १२.९ (-३), अमरावती ११.६ (-५), बुलडाणा १४.० (-२), चंद्रपूर १३.२ (-३), गोंदिया १०.५ (-५), नागपूर ९.८ (-५), वर्धा ११.७ (-३), यवतमाळ १४.० (-२)


इतर अॅग्रो विशेष
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या...मुंबई : राज्यात कोरोनाबाधित १४५ नवीन रुग्णांची आज...
दूध भुकटी योजनेसाठी १८७ कोटी मंजूर मुंबई: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत...
फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी ...नगर : फळे, भाजीपाला विक्रीसाठी नगर जिल्ह्यामधील...
पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी...औरंगाबाद : आधी बागवानाने मागितली तेव्हा दिली नाही...
कृषी उत्पादनांसह निर्धारीत अत्यावश्‍यक...नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणूचा प्रसार...
समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर...मुंबई: कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी...
शेती अवजारे, स्पेअरपार्टस् दुकानांना...नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी (ता...
मराठवाड्यात आजही वादळी पावसाची शक्यता पुणे: उन्हाचा ताप वाढल्याने सोलापूर, मालेगाव,...
करडई संशोधन प्रकल्‍पास मान्यता परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
भारत - इस्राईल मैत्रीतून उजळणार...भारत आणि इस्राईल देशातील पंतप्रधानांच्या भेटीतून...
राज्य अंधारात जाण्याचा धोकाः डॉ. नितीन...मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता.५...
चारशे वर्षात पहिल्यांदाच वारकऱ्यांविना...सोलापूर ः सुमारे ४०० वर्षाची परंपरा असलेल्या...
शेतकरी कंपन्यांचाही ‘ई-नाम’मध्ये समावेश नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर...
राज्यात उन्हाचा चटका वाढला पुणे: एप्रिल महिना सुरू होताच राज्यात उन्हाच्या...
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ३० हजार...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरटंचाई...
कोल्हापुरात तीस हजार ऊस तोडणी कामगार...कोल्हापूर: जिल्ह्यातील सुमारे तीस हजार ऊस तोडणी...
औरंगाबादमध्ये २९ टन मालाची थेट विक्रीकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद शहरात 'शेतकरी...
कोरोनामुळे कृषी पर्यटन व्यवसाय अडचणीत सातारा : कोरोनाच्या संसर्गामुळे दिवसेंदिवस बळी...
संकटावेळी तरी पंतप्रधानांनी गंभीर...मुंबई : देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून...