agriculture news in marathi, cold increases in North Maharashtra | Agrowon

उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला; निफाड ६.२ अंशांवर

टीम अॅग्रोवन
सोमवार, 28 जानेवारी 2019

पुणे : पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत हलक्या पावसाने हजेरी लावली. तर उत्तर भारतातून थंड वाऱ्यांचे प्रवाह येऊ लागल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या तापमानात चढ - उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

पुणे : पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत हलक्या पावसाने हजेरी लावली. तर उत्तर भारतातून थंड वाऱ्यांचे प्रवाह येऊ लागल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या तापमानात चढ - उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

उत्तरेकडून येणारे थंड वारे, पूर्वेकडील उष्ण व बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भात गुरुवारपासून हलक्या पावसाने हजेरी लावली. तुरळक ठिकाणी झालेल्या गारपिटीने पिकांचे नुकसानही झाले. रविवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गडचिरोली येथे १७.४ मिलीमीटर, तर चंद्रपूरात २.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दुपारनंतर पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणात हलके ढग जमा झाले होते. तर उत्तर महाराष्ट्रात गारठा चांगला वाढला होता. धुळे येथील कृषी महाविद्यालयात ६.६ अंश सेल्सिअस तर नाशिक मध्ये ८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातही तापमानात घट झाली असून, किमान तापमान सरासरीच्या खाली घसरले आहे. पश्चिमी चक्रावातामुळे हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यांमध्ये हीमवृष्टी होण्याची शक्यता आहे. पंजाब, राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश परिसरामध्ये किमान तापमानात ४ ते ५ अंशांची घट होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. मध्य भारतातील किमान तापमानाही चढ-उतार होण्याचा अंदाज आहे. तर पहाटेच्या वेळी धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

रविवारी (ता. २७) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १४.७(-३.२), जळगाव १२.४ (-०.१), कोल्हापूर १७.४(१.८), महाबळेश्‍वर १०.२(-३.७), मालेगाव ११.२ (०.३), नाशिक ८.१, सातारा १६.४ (३.४), सोलापूर १७.४(०.६), सांताक्रुझ १८.६(१.१), अलिबाग १८.६ (०.४), रत्नागिरी १८.०(-१.१), डहाणू १५.७(-१.८), आैरंगाबाद १३.०(०.४), परभणी १५.० (-०.२), अकोला १४.५(-०.३), अमरावती १२.०(-३.३), बुलडाणा १२.० (-३.७), चंद्रपूर १५.०(-०.५), गोंदिया १२.८(-१.५), नागपूर १४.२(-१.४), वर्धा १५.०(०.९), यवतमाळ १५.०(-१.२).


इतर अॅग्रो विशेष
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...
राज्यात सर्वदूर हलका पाऊसपुणे ः राज्यातील बहुतांशी भागात हलका ते मध्यम...
सोयाबीनचे एकरी ५१.७७ क्विंटल उच्चांकी...जॉर्जिया येथील व्होलदोस्ता प्रांतामधील रॅंडी...
शेतकऱ्यांचे वनौषधी अनुदान पुन्हा रखडलेपुणे: राज्यात वनौषधी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे...
दुर्गम शेतकऱ्यांसाठी जलकुंडे ठरली वरदानठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील दुर्गम...
बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासन सेवेत...यावल, जि. जळगाव: केंद्राने ‘एक देश एक बाजार समिती...
‘एचटीबीटी’मुळे कपाशीतील आंतरपिके...पुणे : काळ्याबाजारातून आलेल्या तणनाशक सहनशील (...
केळी पिकात तयार केली ओळखमोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव,जि.सांगली) येथील...
बंदीची प्रक्रिया हवी  सुटसुटीत अन्...केंद्र सरकारने १८ मे रोजी २७ कीडनाशकांच्या बंदीचा...
कृषिसेवक भरतीतील गैरव्यवहारावर पांघरूण...पुणे : राज्यात २०१६ मध्ये झालेल्या कृषिसेवक भरती...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा इशारा पुणे ः मध्य प्रदेश व परिसराच्या वायव्य भागात कमी...
संपूर्ण नियमनमुक्तीची अंमलबजावणी करापुणे:  सर्वच शेतमालाच्या संपूर्ण...
बाजार समिती कायद्यात बदल करण्याची मागणीपुणे: शेतमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
भाजपच्या दूध आंदोलनापासून ‘संघर्ष समिती...नगर ः दुधाच्या दरासाठी सातत्याने आग्रही राहून...
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु...मुंबई: दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत...
बीटी कपाशी बियाणे अप्रमाणित ...अकोला ः या हंगामात बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेल्या...
'नाबार्ड’चा व्यवस्थापक नसल्यास अग्रणी...पुणे: कृषी पायाभूत निधी योजनेला प्रत्येक...
देशातील जलसंपत्तीची माहिती आता एका...पुणे ः केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने देशभरातील...