पहाटेच्या गारठ्यात वाढ; धुळे ११ अंशावर

cold
cold

पुणे ः कोरड्या हवामानामुळे पहाटेच्या गारठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे किमान तापमानात हळूहळू घट होऊ लागली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत पहाटेचा गारठा आणखी वाढणार असून किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. बुधवारी (ता. १८) सकाळी धुळे येथील कृषी महाविद्यालयात ११.० अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील अनेक भागात हवामान कोरडे झाले आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात गारठ्यात वाढ होऊ लागली आहे. यामध्ये नाशिक, धुळे या भागात गारठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या पहाटे काही भागात धुके पडत असून दुपारनंतर राज्यातील अनेक भागात हवामान अंशतः ढगाळ होत आहे. त्यामुळे किमान व कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे. खानदेशातील नाशिक, निफाड, धुळे या भागासह मराठवाडा, विदर्भ व मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात किमान तापमानात एका अंशाने घट झाली आहे. कोकणात ढगाळ हवामानामुळे काही प्रमाणात गारठा कमी अधिक असल्याने तापमान २० ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. पुढील काही दिवस तापमान यादरम्यान राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात गारठ्यात आणखी वाढ होईल. महाबळेश्वर, पुणे, निफाड या भागात गारठ्यामुळे १२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान कमी झाले होते. सोलापूर, नगर, सातारा, सोलापूर या भागात १५ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. मराठवाड्यातही गारठ्यात चढ-उतार सुरू असून किमान तापमान १४ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भात किचित गारठा वाढला आहे. यामुळे चंद्रपूर, नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ या भागातील तापमानात घट झाली असून तापमान १३ ते १६ अशं सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते.   बुधवारी (ता. १८) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासातील विविध ठिकाणचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः नगर १५.४ (४), अकोला १३.६ (१), अलिबाग २०.४ (२), अमरावती १४.६, औरंगाबाद १४.३ (३), बीड १६.१ (३), बुलढाणा १४.०, चंद्रपूर १३.८ (१), डहाणू २०.३(२), गोंदिया १२.६ (१), जळगाव १३.० (१), कोल्हापूर १८.१ (३), महाबळेश्वर १३.७, मालेगाव १५.८ (५), धुळे कृषी महाविद्यालय ११.०, मुंबई २२.० (४), नागपूर १३.१ (१),नांदेड १५.० (३), नाशिक १६.० (६), निफाड १२.१, उस्मानाबाद १४.८ (२), परभणी १४.९ (२), लोहगाव १६.६ (४), पाषाण १६.२ (५), पुणे १५.५ (५), रत्नागिरी २३.१(३), सांगली १६.९ (३), सातारा १६.२ (३), सोलापूर १७.५ (२), वर्धा १४.४ (१), यवतमाळ १५.० (१).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com