थंडी वाढण्यास प्रारंभ 

राज्यातील जवळपास सर्वच भागात वातावरण कोरडे झाले. मराठवाडा व विदर्भातील काही भागांत किमान तापमानात घट होऊ लागली आहे.
थंडी वाढण्यास प्रारंभ 
थंडी वाढण्यास प्रारंभ 

पुणे ः राज्यातील जवळपास सर्वच भागात वातावरण कोरडे झाले. मराठवाडा व विदर्भातील काही भागांत किमान तापमानात घट होऊ लागली आहे. यामुळे कमी झालेली थंडी पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली आहे. सोमवारी (ता.११) सकाळी आठ वाजेपर्यंत परभणी कृषी विद्यापीठाच्या आवारात नीचांकी १३.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात काही प्रमाणात चक्रिय वाऱ्यांची स्थितीचे सोमवारी (ता.११) तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर महाराष्ट्र ते पुर्वमध्य अरबी समुद्रा दरम्यान होते. तसेच दक्षिण भारतातील पूर्व भागात हिंदी महासागर व परिसर आणि बंगालचा उपसागराचा दक्षिण  भाग व श्रीलंकेची किनारपट्टी या दरम्यान चक्रिवादळासाठी पोषक वातावरण होते. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यासह देशातील वातावरणात झपाट्याने बदल होण्याची शक्यता असल्याने थंडी कमीअधिक स्वरूपात राहणार आहे. 

मागील काही दिवसांपासून या भागात किमान तापमानात चांगलीच वाढ होऊन थंडी गायब झाल्याचे चित्र होते. मात्र, आता ही स्थिती कमी होत असल्याने पुन्हा थंडी वाढ होत आहे. विदर्भात किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. यामुळे या भागात किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असून थंडी काही प्रमाणात वाढली आहे. मराठवाड्यातही किमान तापमानाचा पारा घसरला आहे. परभणी कृषी विद्यापीठापाठोपाठ उस्मानाबाद येथे १४.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर या भागात १३ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. मध्य महाराष्ट्रातही हवेत गारठा वाढल्याने किमान तापमानात घट होऊ लागल्याने १६ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. कोकणात ढगाळ वातावरण निवळ्याने किमान तापमान १८ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. 

सोमवारी (ता.११) सकाळपर्यत विविध शहरातील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः 

  • मुंबई (सांताक्रुझ) २३.० (६ 
  • अलिबाग २२.७ (५) 
  • रत्नागिरी २३.१ (४) 
  • डहाणू २२.६ (५) 
  • पुणे १८.१ (७) 
  • जळगाव १८.० (६) 
  • कोल्हापूर २०.० (५) 
  • महाबळेश्वर १६.३ (३) 
  • मालेगाव १८.८ (८) 
  • नाशिक १८.२ (८) 
  • सांगली २०.२ (६) 
  • सातारा १८.६ (६) 
  • सोलापूर १८.९ (२) 
  • औरंगाबाद १६.६ (४) 
  • परभणी १६.४ (२) 
  • नांदेड १७.० (३) 
  • उस्मानाबाद १४.४ (३) 
  • अकोला १६.६ (३) 
  • अमरावती १८.३ (४) 
  • बुलडाणा १७.८ (३) 
  • चंद्रपूर १७.४ (३) 
  • गोंदिया १६.८ (४) 
  • नागपूर १७.५ (५) 
  • वर्धा १६.५ (२) 
  • यवतमाळ १६.० (१) 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com