agriculture news in Marathi cold may increased in state Maharashtra | Agrowon

थंडीत वाढ होण्याची शक्यता 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 जानेवारी 2021

राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती आहे. थंडी कमी झाली असून किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत जवळपास आठ सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे.

पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती आहे. थंडी कमी झाली असून किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत जवळपास आठ सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. येत्या दोन दिवसानंतर राज्यात हवामान कोरडे राहणार राहील. त्यामुळे थंडीत किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी (ता.१९) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे नीचांकी १४.६ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

गेल्या चार ते दिवसांपासून अरबी समुद्राच्या परिसरात चक्रिय वाऱ्यासाठी पोषक वातावरणाची स्थिती होती. यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण झाले होते. आता ही स्थिती कमीअधिक स्वरूपात असल्याने किमान तापमानात चढउतार असल्याचे चित्र आहे. यामुळे काही भागात थंडी असून अनेक भागांत थंडी गायब झाल्याचीही स्थिती आहे. 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात थंडीने पूर्णपणे पाठ फिरविली आहे. त्यात ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे श्रीगोंदा, पुणे भागातही तुरळक पावसाने हजेरी लावली होती. परिणामी किमान तापमानात सरासरीपेक्षा अगदी सात ते आठ अंशांनी वाढ झाली आहे. मात्र किमान तापमानाचा पारा कमी होणार आहे.

उत्तर भारतातील दिल्लीसह उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, राजस्थान, या भागात थंडीची लाट आली असून, दाट धुके तयार झाले आहे. याबरोबरच २२ जानेवारीपर्यंत हिमालयीन भागात पश्चिमी चक्रावात तयार होणार आहे. त्यामुळे थंडीच्या लाटेमध्ये वाढ होणार आहे. परिणामी उत्तर भारताकडून राज्याकडे थंड वारे वाहणार आहेत. त्यामुळे राज्यात विदर्भासह सर्वच भागात थंडी वाढण्याची शक्यता आहे. 

मंगळवारी (ता.१९) सकाळपर्यत विविध शहरातील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः 

 • मुंबई (सांताक्रुझ) १९.० (४) 
 • रत्नागिरी २१.५ (३) 
 • डहाणू १८.४ (१) 
 • पुणे १६.६ (६) 
 • जळगाव १७.४ (५) 
 • कोल्हापूर १९.७ (४) 
 • महाबळेश्वर १६.४ (३) 
 • मालेगाव १८.६ (८) 
 • नाशिक १५.२ (५) 
 • सांगली १९.२ (५) 
 • सातारा १८.२ (५) 
 • सोलापूर १८.८ (३) 
 • औरंगाबाद १८.२ (६) 
 • बीड २१.४ (८) 
 • परभणी १७.० (२) 
 • नांदेड १७.० (३) 
 • उस्मानाबाद १७.० (२) 
 • अकोला १७.८ (३) 
 • अमरावती १७.५ (३) 
 • बुलडाणा १९.८ (५) 
 • चंद्रपूर १५.८ (१) 
 • गोंदिया १४.६ (१) 
 • नागपूर १५.६ (२) 
 • वर्धा १६.४ (३) 
 • यवतमाळ १७.० (२) 

इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...