थंडीत वाढ; उत्तर महाराष्ट्र गारठला

cold
cold

पुणे : राज्याच्या तापमानात वेगाने बदल होत आहेत. दोन दिवस विदर्भ आणि कोकणात पावसाने हजेरी लावल्यानंतर गुरुवारी (ता. ३०) अचानकपणे किमान तापमानात मोठी घट झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात तापमानाचा पारा ६ अंशांपर्यंत घसरला. निफाडसह नगरमध्ये थंडीची लाट आली. धुळे, जळगाव, नाशिकमध्येही तापमान १० अंशांच्या खाली घसरल्याने उत्तर महाराष्ट्र थंडीने गारठला. उद्या (ता.१) विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.    उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा अभाव, ढगाळ हवामानामुळे राज्यात दोन आठवड्यापासून थंडीचा कडाका कमी झाला होता. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका काहीसा वाढून उकाडाही जाणवत होता. किमान तापमानात चढउतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. थंडीसाठी वाट पहावी लागण्याची शक्यता असतानाच बुधवारी (ता.२९) रात्रीपासूनच हवेत गारठा वाढू लागला. राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमानात मोठी घट झाली. पारा वेगाने खाली घसरत अनेक ठिकाणी सरासरीच्या तुलनेत तापमान १ ते ४ अंशांनी कमी झाले. १७ जानेवारी रोजी हंगामातील नीचांक २.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्यानंतर निफाड येथे तापमानात पुन्हा घट झाली आहे.  गुरुवारी (ता. ३०) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ११.० (०), नगर ९.७ (-५), धुळे ९.०, जळगाव ८.५ (-४), कोल्हापूर १६.७ (१), महाबळेश्‍वर ११.८ (-२), मालेगाव १०.० (६), नाशिक ७.९ (-३), निफाड ६.०, सांगली १५.८ (१), सातारा १२.० (-१), सोलापूर १६.५ (०), अलिबाग १५.० (-३), डहाणू १४.८ (-३), सांताक्रूझ १३.६ (-४), रत्नागिरी १८.२ (-१), औरंगाबाद ११.३ (-१), परभणी १३.१ (-२), नांदेड १३.० (-२), अकोला १२.३ (-३), अमरावती १३.६ (-२), बुलडाणा १३.० (-३), चंद्रपूर १५.० (-१), गोंदिया १४.०(०), नागपूर १२.२(-२), वर्धा १४.९ (१), यवतमाळ १३.४(-३).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com