agriculture news in Marathi, cold possibilities in State, Maharashtra | Agrowon

गारठा वाढण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 डिसेंबर 2018

पुणे : पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात अंशत: ढगाळ हवामान होत आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. तर विदर्भात मात्र गारठा कायम आहे. उद्यापासून (ता. २७) किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता असल्याने राज्यात गारठा वाढण्याचा अंदाज आहे. तर विदर्भात थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

पुणे : पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात अंशत: ढगाळ हवामान होत आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. तर विदर्भात मात्र गारठा कायम आहे. उद्यापासून (ता. २७) किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता असल्याने राज्यात गारठा वाढण्याचा अंदाज आहे. तर विदर्भात थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र ते दक्षिण अंतर्गत कर्नाटकदरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय स्थिती) सक्रिय आहे.  बंगालच्या उपसागरावरून दमट वाऱ्यांचे प्रवाह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याकडे येत असल्याने या भागाच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. तर विदर्भात मात्र सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद होत असून, गारठा कायम आहे. गोंदिया येथे राज्यातील नीचांकी ८.५ अंश सेल्सिअस, तर नागपूर येथे ९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

उत्तर भारतातही थंडी
उत्तर भारतातील पंजाब, उत्तर राजस्थान, हरियाना, उत्तर प्रदेश,   मध्य प्रदेशात थंडीची तीव्र लाट आली आहे. पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील ०.४ अंश सेल्सिअस    तापमानाची नोंद झाली आहे. गारठविणाऱ्या थंडी बरोबरच उत्तर भारतातील राज्यांमध्ये धुकेही वाढले असून, अमृतसर, लुधीयाना, गंगानगर, पिलाली, दिल्ली येथे २५ मीटर अंतरानंतर दिसनेही अशक्य झाले आहे. गुरुवारपासून उत्तरेकडील गारठा राज्याकडे येण्याची शक्यता आहे.  

मंगळवारी (ता. २५) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १५.९ (४.९), जळगाव १२.० (०.२), कोल्हापूर १९.६ (४.६), महाबळेश्‍वर १५.६ (२.३), मालेगाव १६.२ (५.३), नाशिक १४.३ (४), सांगली १६.२ (१.९), सातारा १६.४ (३.७), सोलापूर १८.१ (२.६), सांताक्रूझ १९.४ (१.४), अलिबाग २०.१ (१.७), रत्नागिरी २१.३ (१.४), डहाणू १९.९ (१.७), आैरंगाबाद १५.४ (३.४), परभणी १४.२ (१), नांदेड १५.५ (३), उस्मानाबाद १६.७, अकोला १४.६ (१.१), अमरावती १३.२ (-१.७), बुलडाणा १६.२ (१.९), चंद्रपूर ११.० (-२.२), गोंदिया ८.५ (-३.७), नागपूर ९.४ (-३.३), वर्धा १२.४ (-०.९), यवतमाळ १४.० (-०.६).


इतर अॅग्रो विशेष
कापूस उद्योगाचे चीनमध्ये पाच हजार कोटी...जळगाव ः देशातील सूत व कापूस गाठींचा मोठा खरेदीदार...
हमीदराने खरेदीसाठी तुरीचे संपूर्ण...वाशीम ः तुरीचे स्वतंत्रपणे पीक घेण्याची पद्धत...
पंधरा लाख कापूस गाठींची खानदेशातील...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
शेतीमाल निर्यातवाढीसाठी सुकाणू समितीची...पुणे : राज्य सरकारने स्वतंत्र कृषी निर्यात धोरण...
बियाणे परवान्यासाठी केंद्रीय पद्धती...नवी दिल्ली: केंद्र सरकार सुधारित बियाणे विधेयक...
शिवनेरीवर उद्या शिवजयंती सोहळापुणे: छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३९० व्या...
चीनला होणाऱ्या कोळंबी निर्यातीला फटकानवी दिल्ली: चीनमध्ये कोरोना विषाणूने थैमान...
कापूस, मक्यावरील अळी नियंत्रणाचे काम...अकोला ः नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कापूस,...
किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाजपुणे : राज्यात कमाल व किमान तापमानात सातत्याने...
'सोया’ पदार्थांना मिळवली ग्राहकांकडून...अमरावती जिल्ह्यातील दुर्गम अंजनसिंगी (ता. धामणगाव...
दर्जेदार फरसबीचे वर्षभर उत्पादनकमी कालावधीतील पिके वर्षभर टप्प्याटप्प्याने...
‘कीडनाशके कायदा’ हवा स्पष्ट शेतकऱ्यांना बनावट कीडनाशके विक्रेत्यांपासून...
राष्ट्रीय मुद्द्यांचा भाजपपुढे गुंतादिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या...
‘कोरोना’च्या अफवेमुळे पोल्‍ट्री...पुणे ः चीनमधील कोरोना विषाणूने जगभरात भीतीचे...
मांसाहारामुळे ‘कोरोना’ अशी अफवा...नागपूर: मांसाहार कोरोना व्हायरसला कारणीभूत...
शेतकऱ्यांचे ‘नाइट लाइफ’ कधी संपेल रे भौ...पुसद, जि. यवतमाळ : ग्रामीण भागात शेतीचे प्रश्‍न...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : निरभ्र आकाशामुळे उन्हाचा ताप वाढून...
संशोधन शेतात पोचले तरच शेतकऱ्यांचा...दापोली, जि. रत्नागिरी ः विद्यापीठांमध्ये चांगल्या...
तुरीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठनागपूर ः खरेदीनंतर चुकाऱ्यास होणारा विलंब आणि...
‘ठिबक’च्या प्रस्तावासाठी २०...सोलापूर : या वर्षी ठिबक सिंचन केलेल्या...