मराठवाडा, विदर्भात थंडी कायम

मराठवाडा, विदर्भात थंडी कायम
मराठवाडा, विदर्भात थंडी कायम

पुणे ः विदर्भातील काही भागांत असलेली थंडीच्या लाटेची तीव्रता कमी झाली आहे. राज्यातील अनेक भागांत थंडी किंचित कमी झाली आहे. कोकणात काही प्रमाणात थंडी गायब झाली असली, तरी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात थंडी कायम आहे. आज (ता. १४) राज्यातील काही भागांत थंडी काही प्रमाणात कायम राहणार आहे. सोमवारी (ता. १३) सकाळी विदर्भातील येथील नागपूर येथे सर्वांत कमी ७.८ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.    हिमालयात बर्फवृष्टी होत असल्याने उत्तर भारतातील दिल्ली, राजस्थान, जम्मू काश्मीर, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब या भागांत थंडीची लाट असल्याने कडाक्याची थंडी आहे. या भागाकडून वाहत असलेल्या थंड वार्यांच्या प्रवाह वाहत असल्याने दोन दिवसांपासून विदर्भातील काही ठिकाणी थंडीची लाट होती. त्यामुळे किमान तापमानाचा पारा पाच अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. रविवारी थंडी किंचित कमी झाल्याने किमान तापमान सात अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते. सध्या पाकिस्तान आणि राजस्थानच्या पश्चिम भागांत चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. यामुळे कोकणातील बहुतांशी भागात हवामान कोरडे असले, तरी थंडी गायब झाली आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. मुंबई, सांताक्रूझ अलिबाग, रत्नागिरी, डहाणू या भागांतही थंडी कमी झाल्याने किमान तापमान २० ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातही थंडी कमी अधिक स्वरूपात आहे. त्यामुळे निफाड येथे १३.२ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान होते. तर उर्वरित नाशिक, पुणे, मालेगाव, जळगाव, महाबळेश्वर, सातारा या भागात थंडी किंचित कमी झाली आहे. सोलापूर, कोल्हापूर, सांगली या भागांतून थंडी काही प्रमाणात गायब झाली आहे.  मराठवाड्यात औरंगाबाद, परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्याच्या बहुतांशी भागात बर्यापैकी थंडी आहे. उस्मानाबाद येथे सर्वात कमी ९.८ अंश सेल्सिअसचे सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. उर्वरित भागात किमान तापमानाचा पारा ११ ते १३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता. विदर्भातही गोदिया, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, अकोला या भागात चांगलीच थंडी होती. त्यामुळे किमान तापमान ७ ते ११ अंश सेल्सिअसच्या दरम्यान  होते.  

सोमवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट: नगर १२.८ (१), अकोला १०.८ (-४), अलिबाग २१.५ (४), अमरावती ११.२ (-३), औरंगाबाद १२.८, बुलडाणा १३.४ (-१), चंद्रपूर ११.४(-३), डहाणू २१.६ (४), गोंदिया १०.२ (-३), जळगाव १३.० (१), कोल्हापूर १७.१ (२), महाबळेश्वर १३.५, मालेगाव १६.० (५), मुंबई २१.५ (४), नागपूर ७.८ (-६), नांदेड १३.०(-१), नाशिक १५.५ (५),  निफाड १३.२, उस्मानाबाद ९.८(-५), परभणी ११.० (-३), लोहगाव १५.९ (४), पाषाण १६.० (४), पुणे १४.६ (४), रत्नागिरी २०.९ (२), सांगली १५.८ (१), सातारा १४.१ (१), सोलापूर १५.१ (-१), वर्धा १०.४ (-३), यवतमाळ ११.४ (-४).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com