थंडी ‘जैसे थे’; गोंदियात ७.५ अंश तापमान

cold
cold

पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून विदर्भातील काही भागांत थंडीची लाट आली आहे. यामुळे विदर्भात अनेक भागांत थंडीचा कडाका वाढला आहे. आज (ता. १३) राज्यात कोरडे हवामान राहणार असून, थंडी काही अंशी कायम राहणार आहे. रविवारी (ता. १२) सकाळी विदर्भातील गोंदिया येथे सर्वात कमी ७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   उत्तर भारतात थंडीची लाट असल्याने या भागात कडाक्याची थंडी आहे. या भागाकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातही थंडी वाढली आहे. विदर्भाच्या दिशेने अधिक प्रवाह असल्यामुळे रविवारी विदर्भातील काही ठिकाणी थंडीची लाट होती. त्यामुळे किमान तापमानाचा पारा सात अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. शनिवारी (ता. ११) किमान तापमानाचा पारा पाच अंश सेल्सिअसपर्यंत खाली होता. रविवारी किमान तापमानात किंचित वाढ झाली होती. गोदिया, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, अकोला या भागात कमी अधिक स्वरूपात थंडी होती.  कोकणातील बहुतांशी भागांत हवामान कोरडे असले तरी किमान तापमानात वाढ झाली आहे. मुंबई, सांताक्रूझ, अलिबाग, रत्नागिरी, डहाणू या भागातही थंडी कमी झाली आहे. या भागात २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते. मध्य महाराष्ट्रातही थंडी कमी अधिक आहे. त्यामुळे नाशिक, पुणे, मालेगाव, जळगाव, महाबळेश्वर, सातारा या भागात थंडी कमी झाली आहे. सोलापूर, कोल्हापूर, सांगली या भागातून थंडी काही प्रमाणात गायब झाली आहे. मराठवाड्यातही औरंगाबाद, परभणी, बीड या भागात किंचित थंडी आहे. किमान तापमानाचा पारा १२ ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता.  रविवारी (ता. १२) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासातील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः  अकोला ११.७ (-३), अलिबाग २०.४(३), अमरावती ११.४ (-३), औरंगाबाद १२.६, बुलडाणा १२.८ (-२), चंद्रपूर १०.४(-५), डहाणू २०.३ (३), गोंदिया ७.५ (-६), जळगाव १३.४ (१), कोल्हापूर १७.५ (२), महाबळेश्वर १३.६, मालेगाव १४.२ (३), मुंबई २०.० (३), नागपूर ७.६ (-६), नांदेड १४.०, नाशिक १३.५ (३), निफाड १२.१, परभणी १२.० (-२), लोहगाव १५.६ (४), पाषाण १५.० (४), पुणे १३.९ (३), रत्नागिरी २०.९ (२), सांगली १७.१ (३), सातारा १४.२ (१), सोलापूर १८.० (१), ठाणे २०.०, वर्धा १०.० (-३), यवतमाळ १२.४ (-३).   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com