थंडी कायम; निफाडला सहा अंश तापमान

थंडी
थंडी

पुणे ः राज्यात कोरडे हवामान झाल्याने किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे.  गुरुवारी (ता.२०) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ६.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  राज्यात वाढलेल्या थंडीमुळे राज्यातील अनेक भागांत धुक्याची चादर परसली आहे. यामुळे किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत ५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. वाढलेल्या थंडीमुळे ग्रामीण भागात ऊब मिळविण्यासाठी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. मध्य महाराष्ट्रातील नगरमध्ये सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसने घट होऊन ६.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा हा ६ ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता. कोकणातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंशांपर्यंत घट झाली होती. किमान तापमान १५ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता. त्यामुळे या भागात थंडी काही प्रमाणात कमीच होती.  उत्तर भारतातील हरियाना, चंदीगढ, दिल्ली, सौराष्ट्र आणि कच्छ व विदर्भ या भागातही थंडीने चांगलाच जम बसविला आहे. या थंडीमुळे पिकांवर दव पडून हवेत आणखी गारवा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी थंडी वाढणार आहे. मराठवाड्यातही गारठा वाढला असून, किमान तापमान सरासरीच्या तुलनेत चार अंशांपर्यंत घसरले असून, किमान तापमानाचा पारा ७.५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आहे. मराठवाड्यात ७.५ ते १० अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते. विदर्भातही थंडीचा चांगलाच जोर होता. विदर्भातील नागपूर येथे ८.६ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. 

गुरुवारी (ता.२०) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः   सांताक्रुझ १५.० (-३), अलिबाग १७.५ (-१), रत्नागिरी १७.४ (-३), ठाणे २०.०, डहाणू १५.० (-३), पुणे ८.८ (-२), नगर ६.४ (-५), जळगाव ९.० (-३), कोल्हापूर १४.९, महाबळेश्वर ११.० (-३), मालेगाव ९.६ (-२), नाशिक ९.३ (-१), निफाड ६.०, सांगली ११.५ (-२), सातारा १०.७ (-२), सोलापूर १३.३ (-२), औरंगाबाद ८.० (-३), परभणी ९.९ (-४), परभणी कृषी विद्यापीठ ७.५, उस्मानाबाद १०.२, नांदेड १०.० (-३), अकोला १०.२ (-३), अमरावती १०.६ (-४), बुलढाणा १०.४(-३), चंद्रपूर १०.२ (-३), गोंदिया ११.० (-१), नागपूर ८.६ (-४), वर्धा १०.९ (-२), यवतमाळ ९.४ (-५)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com