खानदेशात थंडीत वाढ; पारा १४ अंशांवर

खानदेशात थंडीत वाढ; पारा १४ अंशांवर
खानदेशात थंडीत वाढ; पारा १४ अंशांवर

जळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांत थंडी वाढली असून, किमान तापमान १४ अंश सेल्सिअसवर आला आहे. रब्बी पिकांना या हुडहुडी भरविणाऱ्या थंडीचा चांगला लाभ होणार आहे. थंडीचे आगमन उशिराने झाले आहे. पुढे थंडी लांबणीवर पडली तर पिकांना सिंचनाची गरज कमी राहील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.   मागील १२ ते १३ दिवस खानदेशात ढगाळ वातावरण होते. मध्यंतरी हलक्‍या सरीही यावल, जळगाव, धुळे, शिरपूर भागांत कोसळल्या. यामुळे शेतीकामांना काहीसा ब्रेकही लागला होता. परंतु, मागील तीन दिवसांत थंडीचे पुनरागमन झाल्याने रब्बी पिकांबाबत शेतकऱ्यांमध्ये आशादायी वातावरण आहे. सध्या हरभऱ्याला घाटे, फुले लागले आहेत. तर नोव्हेंबरच्या मध्यातील पेरणीच्या गव्हाची चांगली वाढ सुरू आहे. काही शेतकरी गहू अजूनही पेरत आहेत. कोरडवाहू ज्वारी, संकरित ज्वारी निसवली आहे. या सर्वच पिकांना या थंडीचा लाभ होणार आहे.  मागील दोन दिवस धुळे येथील कृषी महाविद्यालय व जळगावनजीकच्या ममुराबाद येथील कृषी संशोधन केंद्रात किमान तापमानाची नोंद १४ अंश सेल्सिअस एवढी झाली आहे. सोमवारीदेखील (ता. ६) वातावरण निरभ्र होते. सकाळी थंड वारे वाहत होते. यामुळे शेतीकामांना सकाळीच वेग आला. मका लागवड सुरू झाली असून, ही लागवड थंडीचा मोसम लांबला तर शेतकऱ्यांसाठी किफायतशीर ठरेल, असे सांगितले जात आहे.  बाजरी पेरणी लांबणार बाजरीची उगवण १२ ते १४ अंश सेल्सिअस तापमानात व्यवस्थित होत नाही. सध्या थंडी वाढत असल्याने बाजरीची पेरणी मकरसंक्रांतीनंतर होईल. शेतकरी पेरणीचे नियोजन करीत असून, कापूस व इतर पिकांखाली रिकाम्या होणाऱ्या क्षेत्रात बाजरीची पेरणी सुरू होईल, अशी माहिती मिळाली.  केळीला फटका एक ते दोन महिन्यांच्या केळी बागांसह निसवणीवरील केळी बागांना थंडीचा फटका बसू लागला असून, करपा रोग फोफावण्याची शक्‍यता आहे. निसवणीवरही परिणाम होऊ शकतो. कारण, अतिथंडीमुळे घड आखूड येतात. तसेच केळीही लवकर पक्व होत नाही. अनेक शेतकरी रात्रीच्या वेळेस केळी पिकाचा थंडीपासून बचाव करण्यासाठी केळीभोवती शेकोट्या करीत आहेत. तसेच केळीचे सिंचन रात्रीच्या वेळी करीत असून, विविध सुक्ष्मअन्नद्रव्यांचा पुरवठाही करीत आहेत, अशी माहिती मिळाली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com