agriculture news in marathi Cold room demonstrations based on zero energy | Agrowon

अंतापूर, ता. सटाणा : शून्य ऊर्जेवर आधारित शितकक्ष प्रात्यक्षिके

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 ऑगस्ट 2021

अंतापूर, ता. सटाणा : सटाणा तालुक्यातील खालचे टेंभे येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत नाशिक येथील के. के. वाघ महाविद्यालयाचा विद्यार्थी महेश कापडणीस याने शून्य ऊर्जेवर आधारित शीत कक्ष बनवले आहे.

अंतापूर, ता. सटाणा : सटाणा तालुक्यातील खालचे टेंभे येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत नाशिक येथील के. के. वाघ महाविद्यालयाचा विद्यार्थी महेश कापडणीस याने शून्य ऊर्जेवर आधारित शीत कक्ष बनवले आहे. सहज उपलब्ध होईल, असे साहित्य वापरून शितकक्ष तयार केले. कमी खर्चातील व कोणालाही तयार करता येईल, अशा सहज सोप्या पद्धतीने भाजीपाला व कोणतेही फळ ठेवण्यासाठी ऊर्जा विरहित त्याची रचना आहे. त्यास शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

महेश याने याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. फळांची साठवण कमी तापमान आणि योग्य आर्द्रतेमध्ये केल्यास साठवण कालावधी वाढविणे शक्य आहे. शीतकक्षात साठवणुकिमुळे शेतकऱ्यांनी पिकविलेले भाजीपाला, फळे जास्त काळ टिकतात. त्यामुळे फळ, भाजीपाला व दूध इतर खाद्यपदार्थ यांची होणारी नासाडी टाळता येते. या शीतकक्षात कोणत्याही ऊर्जेचा वापर होत नाही.

शीतकक्षाची उभारणी कमी खर्चात वाळू, विटा, सिमेंट ,प्लास्टिक, गोणपाट व फळे भाजीपाला ठेवण्यासाठी कॅरेट इत्यादी वस्तूंचा वापर करून करता येते. प्रगतिशील शेतकरी जिभाऊ कापडणीस यांचा महेश मुलगा आहे. या पद्धतीचा त्याचा शेतकरी व नागरिकांना उपयोग होऊ शकतो, असे त्याने सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतिशकुमार हाडोळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. परमेश्वरी पवार, प्रा. सुनील बैरागी यांचे मार्गदर्शन लाभले. 
 


इतर बातम्या
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
गुन्हा दाखल करण्याऐवजी पुन्हा चौकशीचा...पुणे ः जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली मृद व...
शेतकरी आंदोलन लोकसभा  निवडणुकीपर्यंत...नगर : केंद्रातील भाजप सरकारने ठरविलेल्या...
सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन...अकोला : या हंगामात लागवड केलेले कमी कालावधीचे...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार...अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच...
पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर...नगर : नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर...
वालचंदनगर (जि.पुणे) : लाळ्या खुरकूत...वालचंदनगर, जि. पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून...
सांगली : रब्बीचे पावणे तीन लाख हेक्टरवर...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते,...
खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या ...चंद्रपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना...
सांगलीतील पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी...सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठा ७१.३९ टक्...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी...
नांदेडमधील प्रकल्पांत ८२.५७ टक्के...नांदेड : ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला...
नंदुरबार जिल्ह्यात चार साखर कारखाने...जळगाव : खानदेशात उसाची लागवडदेखील बऱ्यापैकी आहे....
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास...सोलापूर ः ‘‘कृषी योजनांचा अधिकाधिक प्रसार करून...
‘‘हतनूर’मधून ३८८ दशलक्ष घनमीटर पाणी...जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९०...