विदर्भात काही भागांत थंडी कायम 

उत्तरेकडून काही प्रमाणात थंड वारे विदर्भाच्या दिशेने वाहत आहेत. यामुळे विदर्भातील काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे.
विदर्भात काही भागांत थंडी कायम 
विदर्भात काही भागांत थंडी कायम 

पुणे ः उत्तरेकडून काही प्रमाणात थंड वारे विदर्भाच्या दिशेने वाहत आहेत. यामुळे विदर्भातील काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. मात्र मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकणात काही अंशी ढगाळ वातावरण असल्याने किमान तापमानात कमालीची वाढ झाली आहे. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत परभणी कृषी विद्यापीठ येथे १६ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली. 

गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोमोरिन परिसर ते अंदमानचा समुद्र या भागांत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तो कोमोरिन परिसराकडून बंगाल उपसागराचा पश्‍चिम मध्य भाग व तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या दिशेने सरकत आहे. त्याचा परिणाम राज्यातील काही भागांवर झाला असून, ढगाळ वातावरण झाले आहे. यामुळे सकाळपासून उकाड्यात वाढ झाली आहे. राज्यातील थंडी कमी झाली असून, किमान तापमानात वाढ झाली आहे. सध्या राज्यातील अनेक भागांत थंडी पळाली आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. 

विदर्भातील काही भागांत काहीशी थंडी असल्याने किमान तापमानाचा पारा जवळपास सरासरीपर्यंत आहे. तर अकोला, बुलडाणा, गोंदिया या भागांत किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. मराठवाड्यात थंडी नसल्याने किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. या भागात १६ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे. मध्य महाराष्ट्र व कोकणात सकाळपासून उन्हाचा चटका वाढला आहे. यामुळे किमान तापमानाचा पारा वाढला असून १७ ते २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान नोंदविले गेले आहे.  रविवारी (ता.१५) सकाळपर्यत विविध शहरातील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई (सांताक्रूझ) २३.५ (२), अलिबाग २३.१ (२), ठाणे २४, रत्नागिरी २२.९ (१), डहाणू २४.२ (३), पुणे १७.४ (३), जळगाव १९ (४), कोल्हापूर २०.५ (३), महाबळेश्‍वर १७.१ (३), मालेगाव २०.२ (६), नाशिक १७.१ (३), निफाड १९.६, सांगली १९.८ (२), सातारा १८.४ (२), सोलापूर १९.२ (१), औरंगाबाद १९ (४), बीड १९.२.(४), परभणी १७.४ (१), परभणी कृषी विद्यापीठ १६, नांदेड २० (४), उस्मानाबाद १९.४ (३), अकोला १८.९ (२), अमरावती १७.१ (-१), बुलडाणा २० (३), चंद्रपूर १७.६, गोंदिया १७.५ (१), नागपूर १८ (१), वर्धा १७. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com