agriculture news in Marathi cold in several places in Vidarbha Maharashtra | Agrowon

विदर्भाच्या काही भागांत थंडी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे झाले आहे. उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह विदर्भाच्या दिशेने वाहण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे विदर्भाच्या काही भागांत पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे.

पुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे झाले आहे. उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह विदर्भाच्या दिशेने वाहण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे विदर्भाच्या काही भागांत पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी (ता.२२) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे ११.६ अंश सेल्सिअस सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

गेले आठ दिवस राज्यातील अनेक भागांत ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाल्याचे स्थिती होती. त्यातच अरबी समुद्रात असलेले कमी तीव्र दाबाचे क्षेत्र पश्चिम नैॡत्य भागाकडे सरकले असून त्याचे ‘गती’ या चक्रीवादळामध्ये रूपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ येमेनमधील सोकोत्रापासून २१० किलोमीटर, सोमालियातील रास बिन्नाहपासून २९० किलोमीटर, तर आलूलापासून पश्चिम नैॡत्याकडे ३६० किलोमीटर अंतर होते. आज त्याची तीव्रता अधिक होणार आहे. त्याचा ताशी वेग १०० ते ११० किलोमीटर एवढा राहणार असून, त्याचा वेग १२० किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.  

उत्तर भारतात असलेल्या थंडीच्या लाटेमुळे किमान तापमानात मोठी घट झाली आहे. पश्चिम राजस्थानमधील चुरू येथे देशातील ५.० अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असून, थंड वारे राज्याच्या दिशेने वाहू लागले आहेत. त्यामुळे गेले काही दिवस कमी झालेली थंडी पुन्हा काही प्रमाणात वाढली असल्याने काही भागांत चांगलाच गारठा वाढला आहे. यामुळे किमान तापमानात घट झाली आहे. 

कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांत किमान तापमानात चढ-उतार झाले आहेत. विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत घट होऊन किमान तापमानात मोठी घट झाली आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा येथील किमान तापमान सरासरीच्या जवळपास आहे. यामुळे या भागात पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे.

रविवारी (ता.२२) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान. (अंश सेल्सिअस) ः मुंबई (सांताक्रूझ) २०.८ (१), अलिबाग २०.७ (१), ठाणे २३.८, रत्नागिरी २३.५ (२), डहाणू २१.४, पुणे १९.३ (५), जळगाव १९.० (५), कोल्हापूर २०.३ (३), महाबळेश्वर १६.४ (२), मालेगाव १५.८ (३), नाशिक १६.० (४), निफाड १५.०, सांगली २०.१ (४), सातारा २०.३ (५), सोलापूर २२.० (५), औरंगाबाद १७.० (४), परभणी १८.५ (४), परभणी कृषी विद्यापीठ १७.०, उ्स्मानाबाद २०.० (६), अकोला १६.५ (१), अमरावती १४.३ (-२), बुलडाणा १५.७, चंद्रपूर १७.० (२), गोंदिया ११.६ (-४), नागपूर १३.८, वर्धा १५.६, यवतमाळ १५.५.


इतर अॅग्रो विशेष
खानदेशात साठवणूकीअभावी कापूस खरेदीत...जळगाव : खानदेशात शासकीय खरेदीला जसा वेग आला, तशी...
मतदानातून लोकनियुक्त सरपंचावर अविश्‍वास...नगर ः थेट जनतेतून निवडलेल्या म्हैसगाव (ता. राहुरी...
संत्र्याची शेतातच लिलावाने विक्री;...परभणी ः जिल्ह्यातील ढेंगळी पिंपळगाव (ता. सेलू)...
नांदेडमध्ये ३४ लाखांचा शेतीमाल घेऊन...नांदेड : शेतीमालाला बाजारात जास्तीचा भाव देतो असे...
राज्यातील मातीत गंधक, जस्त, लोह,...अकोला ः हरितक्रांतीनंतर जास्त उत्पादन देणाऱ्या...
जमीन सुपीकता निर्देशांक आता एका क्लिकवरपुणे ः शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल अशी...
शेतकऱ्याची व्याख्या, वर्गीकरणाची गरज ः...पुणे ः शेतकऱ्यांच्या नावाखाली अनेक धनदांडगे...
टॉवरचा भुलभुलैया, लाखोंचा गंडाकऱ्हाड ः शेतात टॉवर बसवण्यासाठी संपर्क करा, अशा...
आज पुन्हा चर्चा; मंगळवारी भारत बंदनवी दिल्ली ः केंद्राचे तीनही कृषी कायदे...
बुरेवी चक्रीवादळ निवळू लागले; थंडी...पुणे ः बुरेवी चक्रीवादळ तमिळनाडू व आंध्र...
माती जीवंत ठेवाआज पाच डिसेंबर. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘अन्न व...
‘आत्मनिर्भर’ : एक उलटा प्रवासनाणेनिधीच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या इकॉनॉमिक...
‘कल्पतरू’ चिक्कीची टेस्ट एकदम बेस्ट!औरंगाबाद जिल्ह्यात भटजी (ता. खुलताबाद) येथील राणी...
ज्वारी, हरभरा, गहू बियाण्यांचा ‘...शिवणी (जि. जळगाव) येथील पद्मालय शेतकरी उत्पादक...
चक्रीवादळांचा तडाखा यंदा वाढलापुणे : चक्रीवादळ निर्मिती नैसर्गिक असली, तरी...
साखरेची ‘एमएसपी’पेक्षा कमी किमतीने मागणीकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेची विक्री...
काजू उत्पादकांना दिलासामुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील काजू...
का येताहेत चक्रीवादळे? भारताच्या पूर्व भागात असलेला बंगालचा उपसागर,...
कृषी कायद्यांविरोधात राज्यात...पुणे ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि पणन...
किसान समन्वय समितीचा अकोले येथे मोर्चा नगर ः केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना...