agriculture news in Marathi cold slightly increased in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

थंडीत किंचित वाढ 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात आकाश निरभ्र झाले आहे. यामुळे थंडी पुन्हा काही प्रमाणात वाढली आहे. पुढील चार ते पाच दिवस थंडीत चढ-उतार राहणार आहे.

पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यात आकाश निरभ्र झाले आहे. यामुळे थंडी पुन्हा काही प्रमाणात वाढली आहे. पुढील चार ते पाच दिवस थंडीत चढ-उतार राहणार आहे. रविवारी (ता.२१) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे १०.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

लक्षद्वीप परिसर ते उत्तर महाराष्ट्र या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र अजूनही काही प्रमाणात सक्रिय आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत अजूनही अंशतः ढगाळ वातावरण आहे. मात्र हे ढगाळ वातावरण फारसे अधिक नाही. त्यामुळे काही प्रमाणात थंडी अजूनही कायम आहे. मध्य महाराष्ट्रात थंडी कमीअधिक स्वरूपात असल्याने किमान तापमान १० ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. कोकणात ढगाळ वातावरणाचा प्रभाव काहीसा असल्याने किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे थंडी कमी होऊन किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. 

मराठवाड्यातील काही भागांत थंडी वाढली आहे. त्यामुळे किमान तापमानात किंचित घट झाली आहे. परभणी कृषी विद्यापीठाच्या आवारात सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. तर इतर भागांतही थंडी काहीशी असल्याने किमान तापमान १४ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भातही चांगलीच 
थंडी होती. त्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली होती. 

रविवारी (ता.२१) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः 

  • मुंबई (सांताक्रूझ) २१ (२) 
  • ठाणे २०.२ 
  • अलिबाग २१.८ (२) 
  • रत्नागिरी २२ (३) 
  • डहाणू २०.१ (१) 
  • पुणे १४.१ (२) 
  • नगर १५.६ (२) 
  • जळगाव १५.४ (१) 
  • कोल्हापूर १९ (२) 
  • महाबळेश्‍वर १३.९ (-१) 
  • मालेगाव १६.६ (२) 
  • नाशिक १५.२ (३) 
  • निफाड १०.१ 
  • सांगली १९.४ (४) 
  • सातारा १७.५ (३) 
  • सोलापूर १८.१ 
  • औरंगाबाद १५.५ (१) 
  • बीड १५.८ (१) 
  • परभणी १६ 
  • परभणी कृषी विद्यापीठ १३.४ 
  • नांदेड १४.५ 
  • उस्मानाबाद १४.२ (-२) 
  • अकोला १५.६ (-१) 
  • अमरावती १८.२ 
  • बुलडाणा १५.६ (-२) 
  • चंद्रपूर १७.४ 
  • गोंदिया १४.८ (-२) 
  • नागपूर १५.४ (-१) 
  • वर्धा १६.४ 
  • यवतमाळ १५ (-३) 
     

इतर अॅग्रो विशेष
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक पट्यातील साखर...
बाजार समित्या बंद ठेवू नका पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमाल वितरण सुरळीत...
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये...कोल्हापूर : पूर्वेकडील राज्यांनी वाहतूक खर्चात...
कमाल तापमान वाढण्यास सुरुवात पुणे : राज्याच्या अनेक भागांत आकाश कोरडे झाले आहे...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
देशात यंदा सर्वसाधारण पाऊस;...पुणे : देशभरात यंदा मॉन्सूनचा सर्वसाधारण पाऊस...
चैत्री यात्राही यंदा प्रतिकात्मक...सोलापूर ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍...
अवजारे उद्योगावर मंदीचे ढग पुणेः राज्यात पाच अब्ज रुपयांची उलाढाल करणाऱ्या...
फळे, भाजीपाला थेट पणन परवान्याला ६...पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमालाचे नुकसान होऊ नये...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
क्यूआर कोड रोखणार हापूसमधील भेसळ रत्नागिरी ः बाजारपेठेमध्ये ‘हापूस’ची कर्नाटक...
जालन्यात वर्षभरात ४२९ टन रेशीम कोष...जालना : येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात...
राज्यात उन्हाचा चटका वाढणार पुणे : आठवडाभर पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ...
भाजीपाला विकण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान...कोल्हापूर : ‘ब्रेक द चेन’च्या नवीन...
आठवडी बाजारांचे नेटवर्क उभारत यशस्वी...पुणे येथील नरेंद्र पवार व चार मित्रांनी एकत्र...
धान्य प्रक्रियेतून ‘संत तेजस्वी’ ची...शेतकरी गटापासून वाटचाल करीत देऊळगावमाळी (जि....
कोविडला नैसर्गिक आपत्ती घोषित करा ः...मुंबई ः राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्‍...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
कडवंचीचे द्राक्ष आगार तोट्यात जालना : जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून ओळख...