राज्यात थंडीची चाहूल

नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) परतल्यानंतर राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. किमान तापमानाचा पारा १८ अंशांच्या खाली घसरल्याने पहाटे गारठा वाढला आहे.
Cold snap in the state
Cold snap in the state

पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) परतल्यानंतर राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. किमान तापमानाचा पारा १८ अंशांच्या खाली घसरल्याने पहाटे गारठा वाढला आहे. तर कमाल तापमान ३३ अंशांपार गेल्याने दुपारी उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. आज (ता. २३) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

झारखंड ते विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. कोमोरीन परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे केरळ, तमिळनाडूसह दक्षिण भारतात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे. शुक्रवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी कमाल ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काही ठिकाणी तापमान ३३ अंशापार जात उन्हाचा चटका वाढला आहे. तर अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १८ अंशांच्या खाली घसरल्याने पहाटे गारठा जाणवत आहे. नाशिक येथे राज्यातील नीचांकी १४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

शुक्रवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३२.२ (१७), नगर ३२.८ (१६.७), जळगाव ३४.३ (१६.६), कोल्हापूर ३२.५ (२१.५), महाबळेश्‍वर २६.९ (१५), मालेगाव ३२.८ (१६.८), नाशिक ३२.१ (१४.८), सांगली ३३.६(२०.२), सातारा ३२.८(१७.७), सोलापूर ३४.८ (१७.१), सांताक्रूझ ३४.३ (२२.६), अलिबाग ३२.४(२२.२), डहाणू ३२.४ (२३), रत्नागिरी ३६.१ (२२.९), औरंगाबाद ३२ (१५), नांदेड ३३.४ (१८), परभणी ३२.४ (२०.६), अकोला ३३.४ (१८.४), अमरावती ३३ (१५.७), ब्रह्मपुरी ३५.२ (१५.६), बुलडाणा ३१ (१७.४), चंद्रपूर - (१९.४), गडचिरोली ३३.६(२१), गोंदिया ३३.५ (१८.४), नागपूर ३४ (१५.५), वर्धा ३२.५ (१५.६), वाशीम ३२(१६), यवतमाळ ३१.७ (१६).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com