Agriculture news in Marathi Cold snap in the state | Agrowon

राज्यात थंडीची चाहूल

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021

नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) परतल्यानंतर राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. किमान तापमानाचा पारा १८ अंशांच्या खाली घसरल्याने पहाटे गारठा वाढला आहे.

पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) परतल्यानंतर राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. किमान तापमानाचा पारा १८ अंशांच्या खाली घसरल्याने पहाटे गारठा वाढला आहे. तर कमाल तापमान ३३ अंशांपार गेल्याने दुपारी उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. आज (ता. २३) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

झारखंड ते विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. कोमोरीन परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे केरळ, तमिळनाडूसह दक्षिण भारतात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे. शुक्रवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी कमाल ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काही ठिकाणी तापमान ३३ अंशापार जात उन्हाचा चटका वाढला आहे. तर अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १८ अंशांच्या खाली घसरल्याने पहाटे गारठा जाणवत आहे. नाशिक येथे राज्यातील नीचांकी १४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

शुक्रवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३२.२ (१७), नगर ३२.८ (१६.७), जळगाव ३४.३ (१६.६), कोल्हापूर ३२.५ (२१.५), महाबळेश्‍वर २६.९ (१५), मालेगाव ३२.८ (१६.८), नाशिक ३२.१ (१४.८), सांगली ३३.६(२०.२), सातारा ३२.८(१७.७), सोलापूर ३४.८ (१७.१), सांताक्रूझ ३४.३ (२२.६), अलिबाग ३२.४(२२.२), डहाणू ३२.४ (२३), रत्नागिरी ३६.१ (२२.९), औरंगाबाद ३२ (१५), नांदेड ३३.४ (१८), परभणी ३२.४ (२०.६), अकोला ३३.४ (१८.४), अमरावती ३३ (१५.७), ब्रह्मपुरी ३५.२ (१५.६), बुलडाणा ३१ (१७.४), चंद्रपूर - (१९.४), गडचिरोली ३३.६(२१), गोंदिया ३३.५ (१८.४), नागपूर ३४ (१५.५), वर्धा ३२.५ (१५.६), वाशीम ३२(१६), यवतमाळ ३१.७ (१६).


इतर बातम्या
जळगाव जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेकजळगाव ः जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने...
पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात...पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान...
वीजप्रश्नी संतप्त शेतकरी  महावितरण...नाशिक : महावितरण कंपनीकडून सटाणा तालुक्यात थकीत...
कापूस खेडा खरेदी करणाऱ्या ...बुलडाणा ः खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना...
कडुलिंबाची झाडे वाळू लागली पुणे नगर ः नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील...
राज्यातील १२१ आदिवासी  आश्रमशाळा होणार...पुणे ः शिक्षण व्यवस्थेमधील बदलांना सामोरे जात...
लाल कांद्याला उन्हाळच्या  तुलनेत मिळतोय...नाशिक : दिवाळीनंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी...पुणे नगर ः राज्यातील मुदत संपलेल्या परंतु,...
सत्तावीस हजार सहकारी संस्थांच्या ...पुणे ः राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय...
‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी ...सातारा ः स्ट्रॅाबेरी मातृ रोपांवरील आयात शुल्क...
शेतकरी उत्पन्न दुपटीच्या बैठकीला २३... नवी दिल्ली ः संसदेच्या कृषी विषयक स्थायी...
दिवाळी सुटीनंतरच्या बेदाणा  सौद्यात...सांगली ः दिवाळीच्या सुटीनंतर सांगली कृषी उत्पन्न...
स्टॉक लिमिटला नकार;  सोयाबीन बाजाराला...पुणे ः राज्य सरकारने सोयाबीनवर स्टॉक लिमिट लावणार...
भात खरेदीच्या जाचक अटीतून शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरीः ज्या शेतकऱ्यांच्या सात-बारामध्ये...
बीज प्रक्रियेसाठी यंत्राचा वापर वाढलावाशीम : शेतकऱ्यांमध्ये बीजप्रक्रियेचे महत्त्व...
सांगलीत कृषिपंपांची वीजजोड तोडणी सुरुसांगली ः कृषिपंपांच्या वीज बिल वसुलीसाठी...
सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे तीन...पुणे ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या...
फेरफार नोंदीत पुणे जिल्हा आघाडीवरपुणे ः शेत जमिनी खरेदी विक्री दरम्यान अंत्यत...
सोलापूर जिल्ह्यात खरिपातील पीक ...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप...