agriculture news in Marathi, cold in state, Maharashtra | Agrowon

उत्तरेकडील थंडीने राज्याला हुडहुडी; धुळे २.५ अंश
टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 जानेवारी 2019

पुणे : उत्तरेकडील राज्यांमधील हिमवृष्टीमुळे देशभरात थंडीची तीव्र लाट आली आहे. या शीत लहरी महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्याला हुडहुडी भरली आहे. मंगळवारी (ता. २९) सकाळी धुळे येथील कृषी महाविद्यालयात २.५ अंश सेल्सिअस, तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनंतर विदर्भात थंडीचा कडाका वाढला असून, किमान तापमानात सरासरीपेक्षा ६ ते १० अंशांची घट झाली आहे.  

पुणे : उत्तरेकडील राज्यांमधील हिमवृष्टीमुळे देशभरात थंडीची तीव्र लाट आली आहे. या शीत लहरी महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्याला हुडहुडी भरली आहे. मंगळवारी (ता. २९) सकाळी धुळे येथील कृषी महाविद्यालयात २.५ अंश सेल्सिअस, तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनंतर विदर्भात थंडीचा कडाका वाढला असून, किमान तापमानात सरासरीपेक्षा ६ ते १० अंशांची घट झाली आहे.  

वाऱ्यांच्या दिशेत झालेले बदल, आर्द्रता आणि ढगाळ हवामान यांमुळे मध्य प्रदेश, विदर्भ, पंजाब, पूर्व राजस्थान, हरियाना, विदर्भात थंडीची तीव्र लाट आहे. वायव्य भारतातील राज्यांसह विदर्भ आणि मध्य प्रदेशात थंड दिवस अनुभवायला मिळणार आहेत. मंगळवारी सकाळी पश्चिम राजस्थानच्या चुरू येथे १.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रविवारपासून (ता. ३) मध्य भारतात पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे.

विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. यवतमाळ येथे किमान तापमान तब्बल १० अंशांची कमी झाले आहे. तर नागपूर आणि बुलडाण्याच्या तापमानात ८ अंशांची घट झाली आहे. नगर, जळगाव, नाशिक, मालेगाव, अकोला, गोंदिया, नागपूर, आणि यवतमाळचा परा ७ अंशांपर्यंत घसरला होता. आणखी काही दिवस गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.   

मंगळवारी (ता. २९) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ८.७(-३), नगर ७.२ (-५), जळगाव ७.४ (-५), कोल्हापूर १६.६(१), महाबळेश्‍वर १०.६(-३), मालेगाव ६.८ (-४), नाशिक ७.० (-३), सांगली १४.१ (०), सातारा १३.० (-१), सोलापूर १३.६(-३), सांताक्रुझ १९.२(२), अलिबाग १७.४ (०), रत्नागिरी १९.८(१), डहाणू १३.५(-४), आैरंगाबाद ७.९(-४), परभणी ८.२ (-७), नांदेड ११.५ (-३), उस्मानाबाद १०.७, अकोला ६.८(-८), अमरावती ९.४(-६), बुलडाणा ७.६ (-८), चंद्रपूर ९.४(-६), गोंदिया ७.२(-७), नागपूर ६.५(-८), वर्धा ९(-५), यवतमाळ ६.४(-१०).

इतर अॅग्रो विशेष
पशुधनवाढीचे विश्लेषण कधी? आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...
आरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...
तळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...
जिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...
वादळी पावसाचा अंदाज कायमपुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
पावसाचा पुन्हा दणकापुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...
सर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...
बहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...