गुजरातमधील शीतगृहांत गेल्या वर्षीचा गूळ शिल्लक

यंदा गुजरातेतील शीतगृहांमध्ये अद्यापही गेल्या वर्षीचा गूळ तसाच शिल्लक राहिल्याने गुळाची खरेदी कमी प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. परिणामी, दर ज्या प्रमाणात वाढायला हवेत त्या प्रमाणात वाढत नसल्याची सध्याची स्थिती आहे. सध्या गुळास क्विंटलला ३८०० ते ४००० रुपये इतका दर मिळत आहे.
In cold storages in Gujarat Last year's jaggery balance
In cold storages in Gujarat Last year's jaggery balance

कोल्हापूर : यंदा गुजरातेतील शीतगृहांमध्ये अद्यापही गेल्या वर्षीचा गूळ तसाच शिल्लक राहिल्याने गुळाची खरेदी कमी प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. परिणामी, दर ज्या प्रमाणात वाढायला हवेत त्या प्रमाणात वाढत नसल्याची सध्याची स्थिती आहे. सध्या गुळास क्विंटलला ३८०० ते ४००० रुपये इतका दर मिळत आहे.  यंदा गूळ हंगाम नैसर्गिक आपत्तीचा सामना करत सुरू आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे जवळजवळ पंधरा दिवस गुऱ्हाळ घराचे कामकाज थंडावले होते. गेल्या काही दिवसांपासून गूळ निर्मितीला हळूहळू वेग येत आहे. पण गुळाची आवक काही प्रमाणात कमी असली तरी खरेदी तितक्याच उत्साहाने होत नसल्याचे चित्र आहे. डिसेंबरमध्ये प्रामुख्याने व्यापारी शीतगृहात साठवण्यासाठी गूळ खरेदी करतात. डिसेंबरमध्ये साधारणपणे गुळाची आवक ही ज्यादा प्रमाणात होत असते. त्यामुळे व्यापाऱ्यांचा रोजच्या विक्रीपेक्षा ज्यादा गूळ खरेदी करण्याकडे कल असतो.  साधारणतः: मार्च ते सप्टेंबरपर्यंत गुऱ्हाळघरे बंद असल्याने या काळात शीतगृहात साठवलेला गूळ ग्राहकांसाठी उपलब्ध करण्याचे व्यापाऱ्यांचे नियोजन असते. गेल्या वर्षी मात्र जूनपर्यंत गूळ निर्मिती सुरू राहिली. त्यामुळे व्यापाऱ्यांना त्या कालावधीत दररोज गूळ उपलब्ध होऊ लागला. ग्राहकांच्या मागणीनुसार बाजारात गूळ उपलब्ध होत असल्याने शीतगृहातील गूळ तसाच राहिला आहे. त्यामुळे व्यापारी तो गूळ पहिल्यांदा विक्री करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परिणामी सध्या गुळाचा उठाव कमी असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम गूळ दरावर ही होत आहे.  गूळ हंगामामध्ये साधारणपणे डिसेंबरमध्ये व्यापारी खरेदीसाठी स्पर्धा करतात, त्यामुळे दर ही वाढतो. परंतु यंदा ही स्पर्धा दिसून येत नसल्याचे चित्र आहे. व्यापारी गतीने गुळाची खरेदी करत नसल्याने साधारणपणे गुळाला दोwनशे ते तीनशे रुपये कमी दर मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये शीतगृहातील गूळ संपला तर हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात गुळाच्या दरात वाढ होण्याची शक्यता गूळ उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली.

कोल्हापूर बाजार समितीतील गुळाची आवक

  गुळाची दैनंदिन सरासरी आवक  १३ हजार रवे

  यंदाच्या हंगामाची एकूण आवक (१ जानेवारीअखेर): १० लाख  २५ हजार गूळ रवे

दराची स्थिती   प्रत    दर (रुपये, प्रति क्विंटल, सरासरी)   एक नंबर    ४२००   दोन नंबर    ३९२५   तीन नंबर    ३५००   चार नंबर    ३०५०   एक किलो बॉक्स    ३५००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com