थंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवर

थंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवर
थंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवर

पुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन दिवसांपूर्वी तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. राज्यातील थंडीमध्ये चढउतार सुरू आहे. खान्देश व विदर्भात किंचित थंडी वाढली आहे. मंगळवारी (ता.१५) सकाळी आठ वाजेपर्यंत धुळे जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयात ७ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.     मालदीव, कोमोरीन परिसर ते कर्नाटकाचा उत्तर भाग आणि मालदीव परिसर ते अरबी समुद्र या दरम्यान समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर कमी दाबाचे क्षेत्र आहे. याचा राज्यातील हवामानावर फारसा परिणाम होणार नसला तरी किमान तापमानात चढउतार सुरू आहे. मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे ९.० अंश सेल्सिअस तापमान नोदविले गेले. खान्देशातील जळगाव, विदर्भातील गोंदिया, नागपूर येथील किमान तापमान दहा अंशाच्या खाली होते. सध्या पहाटे हवेत गारवा तयार होत असल्याने किमान तापमानात घट होत आहे. मात्र, सकाळी अकरा वाजल्यानंतर कमाल तापमानाचा पारा हळूहळू वाढत असून उन्हाचा चटका वाढू लागला आहे.   कोकणातील बहुतांशी ठिकाणचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढले आहे. त्यामुळे मुंबई, रत्नागिरीतील किमान तापमानाचा पारा १९ अंशापर्यंत पोचला आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, सांगली, सोलापूर येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. कोल्हापूर, सातारा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने वाढले आहे. त्यामुळे या भागातील किमान तापमान १० ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.  मराठवाड्यातही थंडी कमी झाली असून किमान तापमानाचा पारा १३ ते १६ अंश सेल्सिअस, विदर्भातील किमान तापमान ९ ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.    मंगळवारी (ता.१५) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः  मुंबई (सांताक्रुझ) १९.६ (३), अलिबाग १८.६ (१), रत्नागिरी १९.२, डहाणू १६.५, ठाणे १८.२, नगर ११.४ (-१), पुणे ११.८ (१), जळगाव ९.६ (-२), कोल्हापूर १६.५ (२), महाबळेश्वर १३.९ (१), मालेगाव ११.२ (१), नाशिक १०.०, निफाड ९.०, सांगली १३.८, सातारा १४.६ (२), सोलापूर १५.३, औरंगाबाद १३.४ (२), बीड १४.५ (१), परभणी १४.८ (१), उस्मानाबाद १४.१, नांदेड १६.५ (१), अकोला १२.० (-२), अमरावती १३.० (-१), बुलढाणा १३.४(-१), चंद्रपूर १२.८ (-२), गोंदिया ९.८ (-३), नागपूर ९.४ (-४), वर्धा १३.५, यवतमाळ १४.४ (-१),

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com