राज्यात थंडीत चढ-उतार 

अरबी समुद्रात नैर्ऋत्य भागात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राज्यातील थंडीवर होत आहे. राज्यातील काही भागात थंडी कमी अधिक स्वरूपात आहे. पुढील काही दिवस थंडीत चढ-उतार राहणार आहेत.
Hawaman
Hawaman

पुणे ः अरबी समुद्रात नैर्ऋत्य भागात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राज्यातील थंडीवर होत आहे. राज्यातील काही भागात थंडी कमी अधिक स्वरूपात आहे. पुढील काही दिवस थंडीत चढ-उतार राहणार आहेत. बुधवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाड्यातील परभणी कृषी विद्यापीठ येथे १०.४ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  बंगालचा उपसागर आणि हिंद महासागर या परिसरात चक्रीवादळासाठी पोषक वातावरण आहे. समुद्रसपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर हे पोषक वातावरण आहे. तर अरबी समुद्रातही काही अंशी कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहेत. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांनंतर खानदेशातील धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत काहीअंशी ढगाळ वातावरण राहणार असून, तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील. मराठवाडा व विदर्भातही थंडी कमी राहणार असून, किमान तापमानात किंचित वाढ झालेली असेल. मध्य महाराष्ट्रातही काही प्रमाणात थंडी राहणार आहे. कोकणात अजूनही थंडीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.  मागील दोन ते तीन दिवसांपासून थंडीत बदल होत आहे. उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यांना अडथळे तयार होत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत थंडीत चढउतार असल्याचे दिसून येते. मंगळवारी सात अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलेला पारा पुन्हा वाढला आहे. सध्या राज्यात दहा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे. विदर्भात १३ ते १६, मराठवाड्यात १० ते १५, मध्य महाराष्ट्रात १२ ते १९ तर कोकणात २० ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे. 

बुधवारी (ता.९) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ः मुंबई (सांताक्रूझ) २०.८ (२), अलिबाग २०.८ (२), ठाणे २३, रत्नागिरी २३ (३), डहाणू २०.७ (२), पुणे १४.५ (३), जळगाव १४.४ (३), कोल्हापूर २०.५ (५), महाबळेश्‍वर १६.५ (३), मालेगाव १४.६ (३), नाशिक १३.२ (२), निफाड १२.४., सांगली १९.८ (४), सातारा १७ (४), सोलापूर १६.७ (१), औरंगाबाद १४.५ (३), बीड १५.१ (२), परभणी १२.६ (-१), परभणी कृषी विद्यापीठ १०.४, नांदेड १५ (२), उस्मानाबाद १५.७ (२), अकोला १३.९, अमरावती १५.८(१), बुलडाणा १६.२ (१), चंद्रपूर १५.६ (२), गोंदिया १३, नागपूर १४.२ (१), वर्धा १४.६, यवतमाळ १३.५ (-१).   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com