agriculture news in Marathi, cold waive remain in state, Maharashtra | Agrowon

शीत लहर कायम; पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातील थंडीची लाट कायम आहे. रविवारी (ता. १०) निफाड येथे राज्यातील नीचांकी ३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाऱ्यांच्या प्रवाहात होत असलेल्या बदलामुळे किमान तापमानात हळूहळू वाढ होणार आहे. तर पावसाला पोषक हवामान होत असल्याने आज पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातील थंडीची लाट कायम आहे. रविवारी (ता. १०) निफाड येथे राज्यातील नीचांकी ३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाऱ्यांच्या प्रवाहात होत असलेल्या बदलामुळे किमान तापमानात हळूहळू वाढ होणार आहे. तर पावसाला पोषक हवामान होत असल्याने आज पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

उत्तर भारतातील थंड वाऱ्यांमुळे शनिवारी (ता. ९) राज्यातील किमान तापमान वेगाने कमी झाले. त्यामुळे नाशिक, पुणे, महाबळेश्‍वर काही ठिकाणी दवबिंदू गोठले. तर अनेक ठिकाणी तापमान ६ अंशांच्या खाली घसरले आहे. 

त्यामुळे नाशिक, पुणे, महाबळेश्‍वर काही ठिकाणी दवबिंदू गोठले. तर अनेक ठिकाणी तापमान ६ अंशांच्या खाली घसरले आहे. रविवारीही राज्यात अनेक ठिकाणी गारठा कायम होता. धुळे येथील कृषी महाविद्यालयात ३.४ अंश सेल्सिअस, तर परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ६.३ अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. 

राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात बहुतांशी ठिकाणी तापमान १० अंशांच्या खाली आले आहे. पुणे, नगर, मालेगाव, नाशिक, नागपूर येथे तापमानाचा पारा ७ अंशांच्या खाली, तर जळगाव, सातारा, औरंगाबाद, परभणी, अकोला, बुलडाणा, ब्रह्मपुरी येथे १० अंशांच्या खाली असल्याने थंडीची लाट आहे. बंगालच्या उपसागरावरून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे आज (ता. ११) पश्‍चिम महाराष्ट्रात तर उद्या (ता. १२) उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, नाशिक जिल्ह्यांत पावसाला पोषक हवामान असल्याचे हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.  

शनिवारी (ता. ९) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ६.२ (-५.२), नगर ४.९ (-८.१), जळगाव ७.४ (-५.४), कोल्हापूर १५.१ (-१), महाबळेश्‍वर १२.२ (-१.८), मालेगाव ६.२ (-४.९), नाशिक ५, सांगली १०.४ (-५.१), सातारा ९.४ (-४.२), सोलापूर १३ (-४.७), सांताक्रूझ १२.४ (-५.१), अलिबाग १३.६ (-४.०), रत्नागिरी १४.८ (-४.२), डहाणू १३.३ (-४.३), आैरंगाबाद ८.४ (-५.१), परभणी ८.५ (-७.३), नांदेड १०.५ (-३.७), अकोला ८.५ (-६.९), अमरावती १०.४ (-५.९), बुलडाणा ९.३ (-६.७), ब्रह्मपुरी ७.९ (-६.९), चंद्रपूर १२.२ (-३.८), गोंदिया १२.२ (-२.८), नागपूर ६.३ (-८.४), वर्धा १०.१ (-४.५), यवतमाळ ११ (-५.४).


इतर बातम्या
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी व्यापली;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...
कापसाची ३७१ लाख क्विंटल खरेदीनागपूर ः राज्यात आतापर्यंत कापसाची हमीभावाने ३७१....
पुणे जिल्ह्यात पॉलिहाऊसचे मोठे नुकसानपुणेः कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्यांसह...
कापूस नोंदणीला उद्यापर्यंत मुदतवाढअमरावती ः शासकीय हमीभाव योजनेअंतर्गंत कापूस...
राज्यात गुरांचे बाजार सुरु करण्याचे आदेशअकोला ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने...
संकटाच्या मालिका सोसून द्राक्ष हंगामाची...नाशिक: यंदा जिल्ह्यातील द्राक्ष हंगामावर सतत...
लॉकडाउनमध्ये गजबजली ई-चावडीपुणे: शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात...
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...