agriculture news in Marathi, cold wave condition remain in state, Maharashtra | Agrowon

राज्यात थंडीची लाट कायम

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019

पुणे ः राज्यात थंडीचा पारा अजूनही कायम आहे. येत्या दोन ते तीन दिवस ही थंडी कायम राहणार असून, पुढील आठवड्यापासून जोर कमी होण्याची शक्यता आहे. खानदेशातील धुळे कृषी महाविद्यालयात गुरुवारी (ता. ३१) सकाळी आठ वाजेपर्यंत ५.४ अंश सेल्सिअसची राज्यातील सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे ः राज्यात थंडीचा पारा अजूनही कायम आहे. येत्या दोन ते तीन दिवस ही थंडी कायम राहणार असून, पुढील आठवड्यापासून जोर कमी होण्याची शक्यता आहे. खानदेशातील धुळे कृषी महाविद्यालयात गुरुवारी (ता. ३१) सकाळी आठ वाजेपर्यंत ५.४ अंश सेल्सिअसची राज्यातील सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

उत्तर भारतातील जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाना या भागात थंडीचा प्रवाह कायम आहे. मध्य प्रदेशातील मांढला येथे ३.० अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असून, राज्यात उत्तरेकडून थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत थंडीची लाट आहे. ही लाट पुढील दोन ते तीन दिवस राहणार आहे. या लाटेचा परिणाम विदर्भातील काही भागांत अधिक जाणवेल.   

थंड वाऱ्यामुळे राज्यातील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत पारा सात अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. दोन दिवसांपूर्वी हा पारा आठ ते नऊ अंशांपर्यंत खाली आला होता. त्यामुळे विदर्भात व खानदेश व मध्य महाराष्ट्रात थंडीने नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरविली आहे. दिवसाही ही थंडी ऊब जाणवत असल्याने नागरिकांना सुखद दिलासा मिळत आहे. धुळे कृषी महाविद्यालयानंतर निफाड येथे ५.६ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. जळगाव, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथेही किमान तामपान दहा अंश सेल्सिअसच्या खाली होते. त्यामुळे थंडीने पुन्हा चांगलाच जम बसविला असून, पुढील काही दिवस या थंडीचा मुक्काम कायम राहणार आहे.  

गुरुवारी (ता. ३१) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः 
 मुंबई (सांताक्रूझ) १५.४ (-२), अलिबाग १६.६ (-१), रत्नागिरी १७.४ (-२), डहाणू १५.३ (-२), पुणे १०.१ (-१), जळगाव ७.० (-५), कोल्हापूर १६.१, महाबळेश्वर १२.६ (-१), मालेगाव १०.४ (-१), धुळे कृषी महाविद्यालय ५.४, नाशिक ८.६ (-२), निफाड ५.६, सांगली १२.५ (-३), सातारा ११.९ (-२), सोलापूर १३.६ (-४), औरंगाबाद ९.९ (-३), बीड १०.८ (-२), परभणी १०.१ (-५), उस्मानाबाद ११.९, नांदेड ११.५ (-२), अकोला १०.० (-४), अमरावती ९.२ (-६), बुलडाणा १२.२ (-३), चंद्रपूर १०.५ (-२), गोंदिया ७.० (-७), नागपूर ६.३ (-८), वर्धा ९.० (-५), यवतमाळ ९.४ (-७)


इतर अॅग्रो विशेष
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
हलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...
कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...
नाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...
कुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...
काजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...
सोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...
झेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...