जळगाव, अमरावतीत थंडीची लाट

उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी महाराष्ट्रात हुडहुडी वाढवली आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट कायम आहे. बुधवारी (ता. २२) जळगाव येथे नीचांकी ७.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Cold wave in Jalgaon, Amravati
Cold wave in Jalgaon, Amravati

पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी महाराष्ट्रात हुडहुडी वाढवली आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट कायम आहे. बुधवारी (ता. २२) जळगाव येथे नीचांकी ७.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २३) राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने दिला आहे. 

गेले काही दिवस विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाड्यात किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याने थंडीचा कडाका वाढला. विदर्भात बहुतांशी ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमान १० अंश किंवा त्यापेक्षा खाली घसरले आहे. सध्या किमान तापमानात किंचित वाढ होत असली, तरी बुधवारी जळगाव, अमरावती, यवतमाळ येथे थंडीची लाट कायम होती. 

दिवसाच्या कमाल तापमानातही चढ-उतार होत असल्याचे दिसून येत आहे. कोकण वगळता उर्वरित राज्याच्या बहुतांशी भागात कमाल तापमान २९ अंशांपेक्षाही खाली आले आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका झाल्याने हवेत गारठा जाणवत आहे. बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे सर्वाधिक ३२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उत्तर भारतात थंडी लाट कमी होणार पश्‍चिमी चक्रावातामुळे हिमालयात होत असलेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर आणि वायव्य भारतात आलेली थंडीची लाट कमी झाली आहे. बुधवारी (ता. २२) हरियानातील हिस्सार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २३) उत्तर भारतात थंडीची लाट ओसरण्याची शक्यता आहे.

बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २८.८ (११.९), नगर २९.२ (-), जळगाव २९.३ (७.३), कोल्हापूर २८.१ (१६.०), महाबळेश्‍वर २४.४(१३.४), मालेगाव - (१२.४), नाशिक २९.३ (११.४), निफाड २७.८ (८.४), सांगली २८.४ (१३.७), सातारा २७.१(१३.८), सोलापूर ३०.६ (११.३), सांताक्रूझ ३२.५ (१८.६), अलिबाग ३०.६ (-), डहाणू २८.९ (१७.४), रत्नागिरी ३२.३ (१८.५), औरंगाबाद २९ (११.३), नांदेड २९.८ (१२), परभणी २८.४ (१०.६), अकोला २९ (११.३), अमरावती २७.६ (८.९), बुलडाणा २६.८ (११.६), ब्रह्मपुरी २९.१ (१०.२), चंद्रपूर २६ (१०.२), गडचिरोली २५.८ (८.४), गोंदिया २५.५ (९), नागपूर २७.१ (८.५), वर्धा २७.१ (९.४), यवतमाळ २७.५ (१०).

१० अंशांपेक्षा कमी किमान तापमान असलेली ठिकाणे :   जळगाव - ७.३, निफाड - ८.४, गडचिरोली - ८.४, नागपूर - ८.५,  अमरावती - ८.९, गोंदिया - ९.०, वर्धा ९.४, यवतमाळ - १०.०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com