agriculture news in marathi As cold wave from North comes Temperature will decrease in state | Agrowon

राज्यात थंडी परतण्याची शक्यता 

वृत्तसेवा
मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021

उत्तरेकडील वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात थंडी परतण्याची शक्यता आहे. आज (ता.९) राज्यात हवामान मुख्यत: कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : पावसाने उघडीप देताच राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे. उत्तरेकडील वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात थंडी परतण्याची शक्यता आहे. आज (ता.९) राज्यात हवामान मुख्यत: कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

तीव्र कमी दाब क्षेत्रामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. तर राज्याच्या अनेक भागात निरभ्र आकाश असून पावसाने उघडीप दिली आहे. अनेक ठिकाणी २० अंशापार गेलेले किमान तापमान पुन्हा १६ अंश किंवा त्यापेक्षा खाली घसरले आहे.   

राज्याचे किमान तापमान कमी होऊ लागल्याने, पहाटे गारठ्यात पुन्हा गारठा आला असून, काही भागात धुके पडत असल्याचे चित्र आहे. सोमवारी (ता. ८) महाबळेश्वर आणि औरंगाबाद येथे नीचांकी १४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल ३४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदले गेले.   

सोमवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे २९.७ (१५.८), नगर - (१७.६), जळगाव ३१.८(१५.१), कोल्हापूर ३०.५ (१९.८), महाबळेश्वर २३.६(१४.४), मालेगाव ३१.४ (१९.४), नाशिक २७.३ (१७.०), सांगली ३१.७(१८.९), सातारा ३१.०(१७.९), सोलापूर ३३.३ (१६.७), सांताक्रूझ ३२.८(२३.४), डहाणू ३२.९ (२४.३), रत्नागिरी ३४.७ (२३.९), औरंगाबाद २९.९ (१४.४), नांदेड ३३.० (१६.२), उस्मानाबाद - (१७.०), परभणी ३०.५ (१५.५), अकोला ३२.३ (१६.२), अमरावती ३१.४ (१५.७), ब्रह्मपुरी ३३.६ (१५.६), बुलडाणा ३०.० (१५.४), चंद्रपूर ३२.८ (१६.०), गडचिरोली ३२.४(१५.८), गोंदिया ३१.४ (१५.०), नागपूर ३१.२ (१४.१), वर्धा ३०.५(१४.५), वाशीम ३२.० (२०.०), यवतमाळ ३०.५ (१४.५). 

कमी दाब क्षेत्र किनाऱ्यापासून दूर सरकतेय 
पूर्वमध्य अरबी समुद्रात तयार तीव्र कमी दाब क्षेत्र किनाऱ्यापासून दूर सरकू लागले आहे. ही प्रणाली मुंबईपासून ८४० किलोमीटर तर गोव्यापासून ८०० किलोमीटर नैर्ऋत्येकडे आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होत आहे. दरम्यान, अग्नेय बंगालच्या उपसागरात आज (ता.९) कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, पूर्व किनाऱ्याकडे येताना त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. गुरुवारपर्यंत (ता. ११) ही प्रणाली उत्तर तमिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत पोचण्याचे संकेत आहेत. 
 


इतर अॅग्रो विशेष
टिळा तेजाचामराठी भाषेला मातीतल्या कवितेचे लेणं चढवणाऱ्या कवी...
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
सहकाराला मारक कायदे बदलण्याला प्राधान्य राज्यातील सहकारी बॅंकिंग व्यवस्थेचे अभ्यासक...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
‘जुनं ते सोनं' चा खोटेपणा "जुनी शेती खूप चांगली होती. त्या शेतीत खूप...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
कशी केली जाणार आहे शेतीमध्ये...शेतीत मूल्यवृध्दीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
मध्यप्रदेश सरकारची शेतकऱ्यांना प्रति...वृत्तसेवा - मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री...