उत्तर भारत थंडीच्या लाटेने गारठला; निच्चांकी तापमानाची नोंद

दिल्लीत थंडीने पंधरा वर्षांचा, हरियानाचा सहा वर्षाचा तर पंजाबमध्ये ५० वर्षांचा विक्रम तोडला आहे. दिल्लीत काही भागात शनवारी (ता.२) पावसाने हजेरी लावली.
उत्तर भारतात थंडीची लाट
उत्तर भारतात थंडीची लाट

नवी दिल्ली: उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून लडाखच्या द्रास येथे उणे २६.८ अंश सेल्सिअस नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. तसेच काश्‍मीरच्या गुलमर्ग येथे उणे ९ तापमान असून, येत्या तीन, चार दिवसांत आणखी हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. दिल्लीत थंडीने पंधरा वर्षांचा, हरियानाचा सहा वर्षाचा तर पंजाबमध्ये ५० वर्षांचा विक्रम तोडला आहे. दिल्लीत काही भागात शनवारी (ता.२) पावसाने हजेरी लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमध्येही आगामी काही दिवसांत पाऊस पडण्याची आणि तापमान घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीकरांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला. दिल्लीतील तापमान १.१ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. हे तापमान गेल्या पंधरा वर्षांतील सर्वांत कमी नोंदले गेले. गेल्या वर्षी जानेवारीत २.४ अंश तापमान होते. येत्या दोन दिवसांत दिल्ली आणि परिसरात दाट धुक्याचे सावट राहिले. अनेक भागांत आज पावसाने हजेरी लावली. शहरातील तापमान ७ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. 

पंजाबमध्ये भटिंडा सर्वांत थंड  पंजाबच्या थंडीने ५० वर्षांतील विक्रम मोडला आहे. १९७० मध्ये २० डिसेंबर ते ७ जानेवारी या काळात पंजाबचे रात्रीचे तापमान २ अंशांपर्यंत पोचले होते. याही वेळी तशीच स्थिती निर्माण झाली आहे. सध्याचे तापमान सरासरी दोन अंशांपर्यंत राहिले आहे. यात भटिंडा सर्वांत थंड ठिकाण राहिले आहे. या वेळीही उणे ०.२ अंशासह राज्यात सर्वांत नीचांकी तापमान नोंदले गेले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com