agriculture news in marathi cold wave in North India | Agrowon

उत्तर भारतातील सखल भागात थंडीची लाट 

वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

उत्तर भारतातील सखल भागात येत्या चार दिवसात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यादरम्यान किमान तापमान सामान्य तापमानापेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

नवी दिल्ली : उत्तर भारतातील सखल भागात येत्या चार दिवसात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यादरम्यान किमान तापमान सामान्य तापमानापेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पंजाब, हरियानाचा काही भाग, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे गारठा वाढू शकतो. 

माउंट आबूसह राजस्थानात अनेक जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडत आहे. माउंट आबूत चोवीस तासात किमान तापमान अडीच अंशाने घसरून उणे २ वर पोचले आहे. याठिकाणी कमाल तापमान २३.४ अंश सेल्सिअस इतके आहे. काल सिरोहीचे किमान तापमान दोन अंशांने घसरून ७ अंशावर पोचले आणि कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस होते. 

पाटण्याचे तापमान घसरले 
पश्‍चिम भागातून थंड वारे येत असल्याने आणि काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने बिहारच्या सर्वच जिल्ह्यात काल दाट धुके पडले होते. त्यामुळे पाटण्यात दृष्यमानता १०० मीटर नोंदली गेली. त्याचवेळी गंगा आणि सोनच्या परिसरात दृष्यमानता ही ५० ते ७५ मीटर होती. काल सकाळी ऊन पडले होते. परंतु दुपारी पाऊस आल्याने वारे वेगात वाहू लागले. त्यामुळे पारा ७ अंशांपर्यंत घसरला. 

हरियानात तापमान २ अंशावर 
हरियानात थंडी वाढत असून काल रात्री रेवाडीत तापमान २ अंश सेल्सिअस, हिसार येथे २.२ आणि नारनौल येथे २.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. हिमाचलमध्ये मनालीत २.४ तर सिमला येथे ७.५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान होते. पंचकुला येथे ११.३, कर्नाल येथे १२.४ आणि अंबाला येथे १२.६ अंश सेल्सिअस तापमान राहिले. अनेक भागात दृष्यमानता शून्यावर पोचले होते. 

पंजाबमध्ये थंडीची लाट कायम 
पंजाबमध्ये ३० जानेवारीपर्यंत थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. १९९८ नंतर प्रथमच राज्याला थंडीच्या लाटेला सामोरे जावे लागत आहे. पुढील पाच दिवस थंडीच्या लाटेमुळे दाट धुके पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्री तापमानात आणखी घसरण होऊ शकते. १९०१ पासून लोहडीनंतर थंडी कमी होत जाते. परंतु यंदा स्थिती वेगळी आहे. 

दिल्ली-एनसीआरमध्ये थंडी 
दिल्ली-एनसीआरमध्ये थंडी कायम असून काल दिल्लीत किमान तापमान ४.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. थंड वाऱ्यामुळे नागरिक गारठले आहेत. त्याचवेळी १५ ते ३० किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहत असल्याने हवेतील दर्जा सुधारला आहे. येत्या काही दिवसांत राजधानीत आणखी पारा घसरण्याची शक्यता आहे. 


इतर ताज्या घडामोडी
नव्या कृषी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना...नाशिक : श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने सुरू...
येवल्यात ४६ हजार ग्राहकांकडे २६६ कोटी...येवला, जि. नाशिक : तालुक्यातील कृषिपंप धारकांची...
हवामान बदलाचा आंब्यावरील परिणाम...रत्नागिरी ः वातावरणातील चढ-उताराचे आंबा पिकावर...
परभणीत तूर विक्रीसाठी ६ हजार...परभणी ः आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तूर विक्रीसाठी...
आम्हाला सोडून गेले, ते पराभूत झाले :...नगर : राज्य विधानसभेत मी १९८० साली ५६ आमदारांचा...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या...नागपूर ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून...
पी. आर. पाटील साखर संघाचे पुढील अध्यक्ष... कुरळप, जि. सांगली :  सहकार क्षेत्रातील...
निळेली पशुधन संशोधन केंद्रास वंश...सिंधुदुर्गनगरी ः कोकण कन्याळ या शेळी जातीच्या...
सिंधुदुर्गमध्ये बांधले साडेपाच हजार...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात भासणाऱ्या संभाव्य...
अमरावतीत शेतकऱ्यांवर ४३ कोटींच्या...अमरावती : हंगामात बॅंकांकडून पीककर्जाच्या बाबतीत...
भंडाऱ्यात ८९५ शेतकऱ्यांचे सूक्ष्म...भंडारा : सूक्ष्म सिंचनाला जिल्ह्यात शेतकऱ्यांचा...
छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान खरेदीरायपूर : : छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान...
‘किसान गणतंत्र परेड’ शांततेतच होणार नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचा एक...
नक्षत्रांचे गणित चुकू लागलेगावातील वयोवृद्ध माणसे हाताच्या बोटांवर गणिते करत...
पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
हवामान बदलाला अनुरूप पीक पद्धतीची गरजजागतिक पातळीवर विविध मार्गांनी हवेमधील कार्बन...
कृषी कायद्यांविरोधात शेतकरी विधवांचा...यवतमाळ : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांमुळे...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख ७० हजार...नांदेड : जिल्ह्यात रब्बीमध्ये दोन लाख सत्तर हजार...
पावणेतीन हजार कोटींची कामे मंजूर ः...नांदेड : ‘‘कारोना संसर्गाच्या काळात विकास...
खानदेशातील प्रकल्पांत ५८ टक्के पाणीजळगाव ः खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये...