agriculture news in marathi Cold wave in North India deeps the mercury, Punjab hits lowest in decade | Agrowon

उत्तर भारतात थंडीची लाट; पंजाबमध्ये दहा वर्षांतील नीचांकी

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 डिसेंबर 2020

सिमला आणि काश्‍मीरमधील हिमवृष्टीनंतर आता राजधानी दिल्लीत कडाक्याची थंडी पडत आहे. दिल्लीच्या जाफरपूरचे तापमान तापमान ६ अंश सेल्सिअसपेक्षाही कमी नोंदले गेले. अमृतसर शहरात थंडीने गेल्या दहा वर्षाचा विक्रम मोडला

नवी दिल्ली : सिमला आणि काश्‍मीरमधील हिमवृष्टीनंतर आता राजधानी दिल्लीत कडाक्याची थंडी पडत आहे. दिल्लीच्या जाफरपूरचे तापमान तापमान ६ अंश सेल्सिअसपेक्षाही कमी नोंदले गेले. अमृतसर शहरात थंडीने गेल्या दहा वर्षाचा विक्रम मोडला, येथे तापमान ०.४ अंश, तर जालंधरचे तापमान १.६ अंश सेल्सिअस राहिले. बिहारची राजधानी पाटण्यातही थंडी वाढली असून तेथे एका दिवसात तापमान ४ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले. 

राजस्थानात थंडीची लाट कायम आहे. बहुतांश शहरातील तापमान ३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. बहुतांश ठिकाणी किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहिले. जोबनेर आणि माउंट अबू येथे तापमान उणे २.५ आणि चुरू येथे उणे ०.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

मध्य प्रदेशात सहा शहरांतील तापमान ५-६ अंशांवर 
राजधानी भोपाळसह मध्य प्रदेशात कडाक्याची थंडी पडत आहे.  भोपाळमध्ये हंगामातील सर्वांत नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. प्रदेशातील सहा शहरात ५ ते ६ अंशांच्या आसपास आणि २३ शहरांत १० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिले. राज्यात दतिया शहर हे सर्वांत थंड शहर म्हणून नोंदले गेले. तेथे दिवसा तापमान ३.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

पाटण्यात दिवसभरात तापमान ४ अंशांवर 
बिहारमध्ये बहुतांश शहरातील तापमान ३ ते ६ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले. पाटण्यात कमाल आणि किमान तापमानात सरासरी ४ अंश सेल्सिअसची घसरण पाहवयास मिळाली. 

नवी दिल्लीत तापमानात घसरण 
राजधानी दिल्लीत थंडीने माणसाबरोबर प्राणी, पक्षी देखील गारठले आहेत. दिल्ली-एनसीआर येथे तापमानात सातत्याने घसरण होत आहे. काल नजफगडच्या जाफरपूर कला भागात तापमान २.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. एवढेच तापमान सिमल्यातही होते. पालम येथे ३.४, लोधी रोड येथे ३.८. सफदरजंग येथे ४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

पंजाबमध्ये कडाका 
पंजाबमध्ये थंडीची लाट आली असून अमृतसर येथील तापमानाने गेल्या दहा वर्षांतील विक्रम मोडला आहे. या ठिकाणी किमान तापमान ०.४ अंश सेल्सिअस राहिले. जालंधर-कपूरथला येथे १.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. चंडीगड येथे देखील तापमानात घसरण होत आहे. तेथे ४.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. 

रायपूरमध्ये २.५ अंश सेल्सिअस 
उत्तर भारतातून थंड आणि पूर्व भागातून कोरडी हवा येत असल्याने छत्तीसगडमध्ये थंडी दाखल झाली आहे. रायपूर येथे काल रात्री तापमानात २.५ अंश सेल्सिअस घसरण झाली. अंबिकापूर येथे किमान तापमानाचा पारा ५ अंशाने घसरला आहे. तेथे ८.८ अंश तापमान राहिले.


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...