agriculture news in marathi, Cold wave to slow down | Agrowon

थंडीची लाट कमी होणार; गारठा मात्र कायम

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 जानेवारी 2019

पुणे : उत्तरेकडून येत असलेले थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने राज्यातील किमान तापमानात वाढ होत आहे. राज्यात गारठा कायम राहणार असला तरी थंडीची लाटेची तीव्रता कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बुधवारी (ता. २) धुळे येथील कृषी महाविद्यालय अाणि निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

पुणे : उत्तरेकडून येत असलेले थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने राज्यातील किमान तापमानात वाढ होत आहे. राज्यात गारठा कायम राहणार असला तरी थंडीची लाटेची तीव्रता कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बुधवारी (ता. २) धुळे येथील कृषी महाविद्यालय अाणि निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

उत्तरेकडून जमिनीलगत वाहणाऱ्या शीत लहरींमुळे डिसेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात थंडीची लाट आली. निफाड येथे किमान तापमान १.८ अंशांपर्यंत खाली घसरले. तापमान झालेल्या घटीमुळे महाबळेश्वर, बुलडाणा, नगरसह अनेक ठिकाणी दवबिंदू गोठल्याचे दिसून आले. कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष मणी तडकले, स्ट्राॅबेरी पिकावर हिमकण गोळा झाले, तर भाजीपाला पिकांनाही धुके, थंडीमुळे फटका बसला. नववर्षाची सुरवात गुलाबी थंडीने झाली, मात्र किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे. उत्तरेकडून येणारे प्रवाह कमी झाल्याने उद्यापासून (ता. ४) राज्यातील थंडीची लाट कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

उत्तर भारतातील राज्यांमध्ये उणे १ अंशापर्यंत कमी झालेले तापमान आता वाढले आहे. बुधवारी मध्य प्रदेशातील खजुराहो येथे सपाट भूभागावरील नीचांकी ३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. निफाड, धुळ्यासह, परभणीच्या तापमानातही वाढ झाली आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ५.५ अशं सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर जळगाव, सांगली, अकोला, नागपूर येथेही थंडीची लाट होती. जळगाव येथे ६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

बुधवारी (ता. २) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ७.९ (-२.९), जळगाव ६.४ (-५.५), कोल्हापूर १३.७ (-१.०), महाबळेश्‍वर १४.६ (१.८), मालेगाव १०.० (-०.२), नाशिक ७.१ (-३.०), सांगली ८.९ (-५.२), सातारा ९.७ (-२.७), सोलापूर १०.५ (-५.१), सांताक्रूझ १४.६ (-२.५), अलिबाग १६.५ (-०.८), रत्नागिरी १५.७ (-३.४), डहाणू १५.१ (-२.०), आैरंगाबाद ९.४ (-२.०), परभणी ८.९ (-३.८), नांदेड ८.५ (-४.१), उस्मानाबाद १२.०, अकोला ८.९ (-४.५), अमरावती १०.२ (-३.५), बुलडाणा ११.४ (-२.३), चंद्रपूर ९.२ (-३.९), गोंदिया ८.५ (-४.३), नागपूर ६.६ (-५.४), वर्धा ९.६ (-२.७), यवतमाळ १२ (-२.२).


इतर अॅग्रो विशेष
कमी पाण्यामध्ये सीताफळाचे किफायतशीर...सिंचनासाठी पाण्याच्या कमतरतेसह प्रतिकूल...
दर्जेदार वांगी उत्पादनात मानेंचा हातखंडाकसबे डिग्रज (ता. मिरज, जि. सांगली) येथील युवा...
देशी कपाशीतील संशोधनाची शंभरीपरभणी येथील कापूस संशोधन केंद्र, मेहबूब बागची...
जैवविविधता संवर्धनासाठी सामूहिक...नाशिक: पर्यावरणाची योग्य ती काळजी न घेतल्याने...
देशी कापसाचा ब्रॅंड आवश्‍यकपरभणी ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लांब धाग्याच्या...
...'या' बॅंकांचे थकले चौदा हजार कोटी...पुणे : कोरड्या दुष्काळानंतर ओला दुष्काळ आणि त्यात...
तागाच्या पिशव्यांकडे साखर कारखान्यांची...कोल्हापूर : ताग उत्पादकांना चालना देण्यासाठी...
नागपूरात १०.६ अंश तापमान पुणे ः मुंबईजवळील अरबी समुद्रातील चक्रावाताची...
उपयुक्त मधुमक्षिकापालन दुर्लक्षितच! मधमाशी हा निसर्गाने निर्माण केलेला अत्यंत हुशार,...
दर्जानुसारच हवा दरराज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक...
मध ठरू पाहतेय साखरेला पर्याय...खरंच ‘...नागपूर : साखरेमुळे वाढत चाललेल्या आरोग्याच्या...
भविष्यातील आहारामध्ये असतील फुलेहीसामान्यपणे फुलांचे उत्पादन हे व्यावसायिकरीत्या...
खासगी डेअरी उद्योगाला अनुदानाच्या...पुणे  : देशातील दुग्ध व्यवसायाला चालना...
तब्बल 'एवढे' पीकविमा अर्ज दाबून ठेवलेपुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेत कंपन्या...
शेतकरी म्हणतात...तोपर्यंत बँकांच्या...मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांचा सात बारा उतारा...
बदलत्या वातावरणामुळे आंबेमोहराला विलंबरत्नागिरी ः सोबा चक्रीवादळामुळे कोकणातील वातावरण...
कष्ट, अनुभवातून साकारली भाजीपाला पिकाची...मूळचे सावत्रा (ता. मेहकर, जि. बुलडाणा) गावचे...
देशी बियाण्यांची तयार केली सीड बॅंकभाजीपाला, फुलझाडे आणि विविध औषधी, सुगंधी...
बियाणे कायद्यात होणार सुधारणापुणे : देशाचा जुनाट बियाणे कायदा बदलण्याच्या...
ढगाळ हवामानाचा अंदाजपुणे ः अरबी समुद्रात असलेल्या पवन चक्रीवादळाचा...