कडाक्याची थंडी

कडाक्याची थंडी
कडाक्याची थंडी

पुणे :  राज्यातील थंडीचा पारा घसरलेलाच आहे. मराठवाडा व पश्चिम विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्याच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चांगलीच घसरण झाली आहे. त्यामुळे या भागातही थंडी वाढली असून नगर, नाशिक, जळगाव, नागपूर या जिल्ह्याच्या परिसरातही थंडीचा पारा जवळपास जैसे थे असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  उत्तरेकडून येत असलेले थंडीच्या लाटेमुळे राज्यातील किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. नाशिकमधील निफाड येथील गहू संशोधन केंद्रातील किमान तापमान एक ते दीड अंश सेल्सिअसची वाढ झाली असून राज्यातील सर्वात कमी ३.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. राज्यात येत्या दोन ते तीन दिवस ही थंडी काही प्रमाणात राहणार आहे. त्यानंतर हळूहळू किमान तापमानाचा पारा वाढून थंडी कमी होण्यास सुरवात होण्याची शक्यता आहे. थंडीच्या लाटेमुळे मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत आठ अंशापर्यंत खाली आला आहे. विदर्भातील नागपूर येथील पारा सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक आठ अंशापर्यंत खाली येऊन ५.४ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. नगरमध्ये सरासरीच्या तुलनेत सात अंश घट झाली आहे. निफाड पाठोपाठ नगरमध्ये ४.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. चंद्रपूर, सोलापूर, गोंदिया, परभणी येथील किमान तापमानातही सरासरीच्या तुलनेत सहा अंशापर्यंत घट होऊन किमान तापमानाचा पारा सहा अंशापर्यंत खाली आला आहे. कोकणातही थंडी किंचित वाढली असून पारा एक ते दोन अंशाने घसरला आहे. राज्यात कोरडे हवामान असल्याने आज आणि उद्या विदर्भात तुरळक ठिकाणी लाट येण्याची शक्यता आहे.  सोमवारी (ता. ३१) सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमान, कंसात घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः  मुंबई (सांताक्रुझ) १४.८ (-४), अलिबाग १५.९ (-१), रत्नागिरी १७.० (-२), डहाणू १४.० (-३), पुणे ७.६ (-३), जळगाव ६.२ (-५), नगर ४.६ (-७),  कोल्हापूर १३.५ (-१), महाबळेश्वर १२.४ (-१), मालेगाव ७.४ (-३), नाशिक ६.२ (-३), सांगली ९.३ (-४), सातारा ९.४ (-३), सोलापूर ९.७ (-६), औरंगाबाद ८.४ (-२),  परभणी ७.५ (-६), उस्मानाबाद १०.९, नांदेड १२.५, अकोला ७.२ (-५), अमरावती ९.६ (-५), बुलढाणा १०.८(-४), चंद्रपूर ६.८ (-६), गोंदिया ६.७ (-६), नागपूर ५.४ (-८), वर्धा १०.० (-५), यवतमाळ ९.४ (-५)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com