यंदा थंडी कमीच राहणार; डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंतचा अंदाज

यंदा थंडी कमीच राहणार; डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंतचा अंदाज
यंदा थंडी कमीच राहणार; डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंतचा अंदाज

पुणे : देशाच्या बहुतांशी भागांत यंदाच्या हिवाळी हंगामामध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा अर्धा ते एक अंशाने अधिक राहील. महाराष्ट्रातही किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असून, राज्यातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटांचे प्रमाण कमीच असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे.  भारतीय हवामान विभागाने डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांचा अंदाजात जाहीर केला आहे. २०१६ पासून ‘मॉन्सून मिशन फोरकास्टिंग सिस्टिम’च्या साहाय्याने उन्हाळा आणि हिवाळा हंगामाचा अंदाज जाहीर करण्यात येतो.  त्यानुसार हिवाळ्यात डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यातील 

हवामान उपविभागनिहाय तापमानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यासाठी १९८१ ते २०१० या कालावधीतील सरासरी तापमान विचारात घेण्यात आले आहे. यंदाच्या हंगामात जम्मू-काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा, छत्तीसगड या उपविभागात किमान तापमान सरासरीइतके म्हणजेच ०.५ ते -०.५ अंशांदरम्यान राहील, तर देशातील उर्वरित सर्वच ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा ०.५ ते १ अंशांनी अधिक राहण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाना, जम्मू काश्‍मीर, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, सौराष्ट्र या विभागात थंडीच्या लाटा येतात. मात्र यंदा या विभागातही किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता ३९ टक्के आहे. त्यामुळे या विभागात थंडीच्या लाटांचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली अाहे. यंदाच्या हंगामात दर आठवड्याला किमाल व किमान तापमानाचा अंदाजही देण्यात येईल, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

हिवाळ्यात सौम्य एल-निनोची शक्यता प्रशांत महासागरातील ‘एल-निनो’ स्थितीचा देशातील मॉन्सूनच्या पावसावर परिणाम होत असतो. सध्या प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील समुद्राच्या पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. ग्लोबल क्लायमेट मॉडेलनुसार यंदाच्या हिवाळ्यात सौम्य ‘एल-निनो’ स्थिती तयार होण्याची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

मराठवाड्यात सर्वाधिक वाढ? यंदाच्या हवाळ्यात देशाच्या बहुतांशी भागांत यंदा कमान तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता आहे. यात मराठवाड्याचे किमान तापमान सरासरीपेक्षा सर्वाधिक ०.९३ अंश सेल्सिअसने अधिक, तर रायलसिमामध्ये ०.९० अंशांनी अधिक राहणार असल्याचे अंदाज आहेत.  राज्यातील किमान तापमानातील संभाव्य वाढ (अंश सेल्सिअसमध्ये)

विभाग   किमान तापमानातील वाढ
कोकण ०.७०
मध्य महाराष्ट्र ०.८७
मराठवाडा ०.९३
विदर्भ  ०.८८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com